संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरातील प्रभाग क्र 1 ते 16 मध्ये पट्टे वाटप करण्याकरिता महाविकास आघाडी सरकार मधील माजी पालकमंत्री डॉ नितीन राऊत तसेच माजी मंत्री सुनील केदार यांनी कामठी शहरात पट्टे वाटप करण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी आर विमला यांना निर्देश दिले होते त्यानुसार माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या सतत पाठपुराव्या नंतर जिल्हाधिकारी ने कामठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, भूमिअभिलेख उपअधीक्षक,मुख्याधिकारी यांची तातडीने बैठक बोलावून सदर जागेचा नकाशा तसेच जागेचे मोजमाप करण्याचे निर्देश दिले होते त्यावर मुख्याधिकारीने कामठी नगर परिषद द्वारा निविदा मागवून कंत्राट दारा मार्फत जागेचे मोजमाप करून प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.कामठी शहरात एकूण एक हजार लोकांना पट्टे वाटप करायचे असून प्रभाग क्र 15 ते 16 मध्ये पट्टे धारकांची संख्या जास्त आहे .पट्टे वाटप संदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली असून वाटपास शिंदे फडणवीस सरकार द्वारा विलंब होत असल्याने सात दिवसात पट्टे वाटप करावे अश्या मागणीचे निवेदन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,माजी सभापती नीरज लोणारे,सविता शर्मा,ममता कांबळे,आरिफ कुरेशी,धीरज यादव,इर्शाद शेख, सलामत अली,तुषार दावाणी,नरेंद्र शर्मा, आशिष मेश्राम,आकाश भोकरे,कुसुम खोब्रागडे,आदी उपस्थित होते.