संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यात सर्व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुद्दत आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी :- भारत देशातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाला बेमुद्दत संपाचा ईशारा दिला होता त्यानुसार आंदोलक कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यात 13 मार्च रोजी झालेली बैठक निष्फळ ठरली त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी, एकच मिशन जुनी पेन्शन च्या मागणीसाठी आज 14 मार्च पासून समस्त कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुद्दत संपाला कामठी तालुक्यातील समस्त सरकारी,निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पाठींबा देत येथील तहसील कार्यालय,नगर परिषद कर्मचारी आदी विभागाच्या वतीने बेमुद्दत कामबंद संप पुकारला .
या बेमुद्दत संपात समस्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविल्याने कामठी तालुका प्रशासनातील समस्त दैनंदिन कामे खोळंबली ज्याचा नागरिकांना चांगलाच फटका बसला .