अकोला आणि नागपूर निकाल भाजपच्याबाजुने लागला तरी या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाला – नवाब मलिक

मुंबई  – अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यसरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्रसरकारने कायदा करुन ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पध्दतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्रसरकारकडे करु असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बावनकुले की जीत पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया

Tue Dec 14 , 2021
नागपुर: बीजेपी नेता पूर्व उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विधान परिषद चुनाव में भारी जीत हासिल की. हालांकि बीजेपी से कांग्रेस में शामिल हुए छोटू भोयर को सिर्फ एक वोट में संतोष करना पड़ा।चर्चा है कि श्री भोयर को कांग्रेस ने पूरी तरह से धोखा दिया है। पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर में अपनी पहली प्रतिक्रिया दर्ज की। बीजेपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com