विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले “आपले आमदार…”

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. वंचितने अनेक उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. एकीकडे निवडणुकांची धामधूम असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया पार पडल्या. आता प्रकाश आंबेडकरांनी रुग्णालयातूनच जनतेला एक मोलाचा संदेश दिला आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मतदारांना एक मोलाचा संदेशही दिला आहे. “मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा”, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते हॉस्पिटलमध्ये दाखल असून, आयसीयूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे.

आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची

“दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा”, अशी सादही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला घातली आहे.

Credit by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा

Sat Nov 2 , 2024
चंद्रपूर :- अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडखोरी केली आहे. एका ‘यूट्यूब चॅनल’ला दिलेल्या मुलाखतीत पाझारे भावूक झाले आणि त्यांनी आता माघार नाहीच, अशी भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलणार, असा इशाराही त्यांनी दिला. पाझारे यांचे हे पाऊल चंद्रपूरचे भाजप उमेदवार किशोर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!