प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कामठी तालुक्यातील बहुतांश लाभार्थी माझी कन्या भाग्यश्री च्या योजनेपासून वंचित

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 23-मुलींच्या जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचे शिक्षण , आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविण्यास सुरुवात केली यानंतर या योजनेत सुधारित योजना म्हणून 1 ऑगस्ट 2017 पासून सुधारित स्वरूपात शासन निर्णयानुसार माझी कन्या भाग्यश्री नवीन स्वरूपात आली आहे.मात्र 1 एप्रिल 2016 व 1 ऑगस्ट 2017 नुसार राबविन्यात येत असलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचे पात्र लाभार्थी असूनही संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व कर्तव्यात केलेल्या हलगर्जीपणामुळे कामठी तालुक्यातील बहुतांश लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकला नाही ही शोकांतीकाच म्हणावी लागेल.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कामठी अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्याना लाभ देण्यात येतो यानुसार योजना सुरू झाल्यापासून कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मागील पाच वर्षात माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे एकूण फक्त 111 लाभार्थी आहेत त्यातील 63 लाभार्थ्याना सदर योजनेचा लाभ मिळाला मात्र 48 लाभार्थी अजूनही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत तर यातील काहो लाभार्थी मागील दोन वर्षांपासून या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्याचे मुख्य कारण पंचायत समिती कामठी च्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कामठी च्या प्रशासकीय विभागाचा हलगर्जीपना दिसून येतो.वास्तविकता लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडल्या नंतरच लाभाचा निधो दिला जातो मात्र संबंधित विभाग व राष्ट्रीयकृत बँक यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे काही लाभार्थ्यांचे बँक बचत खाते उघडण्यासाठी कामठी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेला अर्ज करण्यात आले मात्र बँकेकडून खाते उघडून न दिल्यामुळे सदर लाभार्थी मागील कित्येक दिवसापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे तर संबंधित बँकेचे अधिकारो या आरोपाला फेटाळत लावत आहेत.तेव्हा लाभ मिळवून देण्यात हैयगयपणा कुणाची?असा प्रश्न पडला असला तरी संबंधित प्रशासन विभाग व संबंधित बँकेच्या संमन्वयाच्या वादात विनाकारण लाभार्थीला लाभापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.हो एक शोकांतिकाच म्हणावी लागेल ..तर शासनाच्या या कल्याणकारी योजनेला खुद्द शासकीय नोकरदारच हरताळ फासल्या जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
या माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एका मुलीला जन्म दिल्यानन्तर माता किंवा पित्याने कुटूब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानन्तर शासनाकडून मुलीच्या नावे 50 हजार रुपये तर दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाकेल्यानन्तर दोन्ही मुलीच्या नावे 25 हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येतात. या मुदत ठेवींवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येते तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येते.
माता किंवा पिता यानी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाकेल्यानन्तरच ठेवीची रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येते व जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असनारी व्याजाची रक्कम तिला प्राप्त होऊ शकेल .कुटुंबात पहिले व दुसरे अपत्य मुलगी असल्यासच योजनेचा लाभ घेता येतो मात्र तीसरे अपत्य जन्मल्यास त्यास योजनेचा लाभ मिळू शकत नाही आणि पहिल्या दोन्ही अपत्यांचे लाभ बन्द होतात मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या योजनेस पात्र असतील .बालगृहतिल अनाथ मुलिसाठी ही योजना लागू आहै ,यासाठी लाभार्थी मुलींचे वडील महाराष्ट्राचे मुळ रहिवासी असणे आवश्यक आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आणि दहाविचि परीक्षा उत्तीर्ण होन्यासह वयाच्या 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत ति अविवाहित असणे आवश्यक आहे एका मुलीच्या जन्मांनन्तर एक वर्षाच्या आत तर दोन मुलीनन्तर 6 महिन्याच्या आत माता किंवा पिता यानी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाकेलेल्या कुटुंबानाच या योजनेचा लाभ घेता येते.,या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिची आई यांच्यानावे संयुक्त बचत खाते राष्ट्रीयकृत बैंकेत उघडावे लागतात त्यामुळे दोघिना एक लक्ष रूपयाचा अपघात विमा आणि 5 हजार रुपये ओवरड्राफ्ट व इतर लाभ प्राप्त होतात .या योजनेमुळे योजनेचा मुख्य उद्देश्य यशस्वी होउ शकतो .मात्र संवंधित विभागाकड़ून या योजनेची प्रभावी जनजागृति झाली नसल्याने अजूनही कित्येक आई वडील या योजनेपासून अनभिज्ञ आहेत परिणामी कित्येक लाभार्थी या योजनेपसुन अजूनही वंचित आहेत.
-राजेश रंगारी(अध्यक्ष, महादूला नगर पंचायत):-कामठी पंचायत समिती चे एकात्मिक बाल विकास प्रकाल्प विभाग कामठी चे कार्यालयीन कर्मचारो तोडकर यांनी कर्तव्यात कसूर केला असून कर्तव्यात केलेल्या हलगर्जीपणामुळे माझी कन्या भाग्यश्री चे लाभार्थी मागील दोन वर्षांपासून वंचित राहतात ही एक शोकांतीकाच आहे.तेव्हा कर्तव्यात कसूर करणाऱ्या तोडकर नामक कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करून या योजनेच्या लाभार्थ्याना लाभ मिळवुन द्यावा व या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यानी या योजनेपासून वंचित न राहावे यासाठी संबंधित विभागाने प्रशासनिक भूमिका साकारावी.व दोषी तोडकर चे निलंबन न केल्यास आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.संबंधीत विभागाकडून माझी कन्या भाग्यश्री या योजनेची प्रभावी जनजागृती करीत नसल्याने अजूनही कित्येक आई वडील या योजनेपासून अजूनही अनभिज्ञ आहेत.तर शासकीय कसर्मचाऱ्याकडूनच शासकीय योजनेची थट्टा उडविली जाते हे कितपत योग्य…

तोडकर(कामठी पंचायत समिती कर्मचारी)
-उपरोक्त विषयान्वये विचारपूस केली असता तोडकर यांनी सांगितले की माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभार्थ्याना लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे गरजेचे असते यानुसार लाभार्थी अर्जदाराचे बँक खाते अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र कडे सादर करण्यात आले मात्र कित्येक दिवस झाले तर बँकेने अर्जदाराचे बँक खातेच उघडून न दिल्याने लाभार्थीला लाभ घेता आला नाही याला संबंधित बँकेचा दुर्लक्षितपणा जवाबदार आहे तसेच खातेदारांचे पासबुक व खाते क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी 30 मार्च 2021,27 मार्च 2019, 22 जून 2020, 16 डिसेंबर 2019, 6 मार्च 2021,11 ऑक्टोबर 2021 व नुकतेच 24 जानेवारी 2022 ला बँकेला स्मरण पत्र पाठविण्यात आले आहे.बँकेकडून लाभार्थ्यांचे संबंधित बँकेकडून खाते क्रमांक येतात योजनेचा लाभ देता येईल.

शाखा प्रबंधक-(बँक ऑफ महाराष्ट्र)नुकतेच जानेवारी महिन्यात सदर योजनेचे 25 अर्जदाराचे बँक खाते उघडून दिले आहेत त्याआधीचे कुठल्याही लाभार्थ्यांचे अर्ज बँकेकडे आले नाही आणि पंचायत समितो चे तोडकर हे बँकेच्या कारभारावर खोटा आरोप करीत आहेत त्यांनी जर अर्ज सादर केले असेल तर त्याची पोच अर्ज ची दुय्यम प्रत कार्यालयास सादर करावी .असे निदर्शनास आल्यास त्वरित खाते उघडून देण्यात येतील असे सांगण्यात आले आहे मात्र तोडकर यांनी अजुनपावेतो पोचअर्ज ची दुय्यम प्रत सादर केली नाही यात बँकेची कुठलीही चूक नसल्याचा दावा केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान भाजप तर्फे शहीद दिन

Wed Mar 23 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 23:- भारतीय जनता पार्टी कन्हान शहर आणि भारतीय जनता पार्टी पारशिवनी तालुका तर्फे आज बुधवार दिनांक २३ मार्च शहिद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या शहिद दिवस निमित्य त्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली कार्यक्रम शाहिद चौक कन्हान येथे घेण्यात आला या वेळी उपस्थित भाजपा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com