अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची’दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी लागू असलेली ‘आदर्श आचारसंहिता’ याविषयी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ वृत्त निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आदर्श आचारसंहिता म्हणजे काय ? या कालावधीत काय करावे आणि काय करू नये, समाज माध्यमांसाठी नियम, पेड न्यूज कोणती असते, आचारसंहिता भंग केल्यानंतर होणारी कारवाई यासह आचारसंहितेबद्दल सविस्तर माहिती डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची मुलाखत सोमवार दि. २२, मंगळवार दि.२३ आणि बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र दिन पूर्व तयारी बैठक, कोकण भवनात आढावा

Sat Apr 20 , 2024
नवी मुंबई :- 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या महसूल शाखेचे उपायुक्त विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लागू असलेल्या आचारसंहितेमुळे यंदा महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण साध्यापध्दतीने होणार असल्याची माहिती उपायुक्त विवेक गायकवाड यांनी दिली. कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत उपआयुक्त सामान्य अमोल यादव, उपआयुक्त विकास गिरीष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com