निवड यादीतील प्रशिक्षणार्थी शासकीय अधिकारी-कर्मचारी आढळल्यास कारवाई होणार : महाज्योती

नागपूर :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरच्या निवड यादीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नावे असल्याबाबत आणि पगारा सोबतच शिष्यवृत्ती घेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे. संस्थेकडून निवड यादीत प्रशिक्षणार्थी हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी असून सुद्धा वेतनासोबत शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत अश्यांवर संस्थेकडून पडताळणी करू योग्य कार्रवाई करण्यात येणार, असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

खवले यांनी सांगितले की, या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की नुकताच महाज्योतीचा यूपीएससी, एमपीएससी, गट ब आणि क प्रशिक्षणाबाबतचा निकाल जाहीर झालेला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत प्रशिक्षण संस्थांना रुजू होण्याकरिता वेळ देण्यात आलेला आहे. सद्यास्थितीमध्ये कोणतेही विद्यार्थी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याला पगारासोबत शिष्यवृत्ती देण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. तथापि शासन सेवेमध्ये तसेच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी महाज्योतीच्या शिष्यवृत्तीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून अशा उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळणार नाही अशा आशयाचे परिपत्रक महाज्योतीने यापूर्वीच निर्गमित केलेले आहे.

 …तर नाव बाद करण्यात येणार

एखादा प्रशिक्षणार्थी नोकरी करत असेल, शासन सेवेत असेल आणि तरीही माहिती लपून तो जर प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहिला तर प्रशिक्षण कार्यक्रमांमधून त्याचे नाव बाद करण्याची कारवाई करण्यात येईल. या अनुषंगाने एखादा शासकीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत असल्याबाबतची माहिती कोणाकडेही उपलब्ध असल्यास ती माहिती महाज्योती कार्यालयाकडे कळविण्याबाबतचे आवाहन करण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा लाभ देणे हे महाज्योतीचे धोरण आहे. कोणत्याही प्रकारचा अपात्र विद्यार्थी प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे संस्थेकडून कळिवण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रस्त्यावरील बेघरांना मनपा समाज कल्याणचा मदतीचा आसरा

Tue Dec 5 , 2023
– रात्रीच्या वाढत्या थंडी बेघरांसाठी सहा निवारागृहांची व्यवस्था नागपूर :- शहरातील थंडी वाढत चालली असून, रस्त्यावरील बेघरांना नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे मदतीचा हात देत आसरा दिला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवारा चमूने 4 डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवित मिठा नीम दर्गा, संविधान चौक, सदर, गड्डी गोदाम आणि इंदोरा येथे थंडीच्या वातावरणात रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या बेघर व्यक्तींना मदतीचा आसरा दिला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com