– स्थानिक गुन्हे शाखा (एलसिबी ) पोलिसांची कारवाई : 12 लाखांचा मुद्देमाल जप्त ,10 गौवंश जनावरे सुटका
कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखा (एलसिबी) नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या गौवंश जनावरे वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली असून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून अटक आरोपी नामे 1) शिवसागर जगन्नाथ मिश्रा , (वय 41) वर्ष, रा.नालासोपारा ईस्ट पालघर मुंबई , (2) रामभरोसे रमेश यादव,( वय 33) वर्ष, रा. मुसा खांड चकिया,उत्तर प्रदेश अशी आरोपीचे नाव आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा (एलसिबी ) पोलिसांनी सोमवार 29 जनवरीच्या 3.00 ते 4.00 वाजता दरम्यान बोरडा टोल नाकया जवळ केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा (एलसिबी) नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहिती प्रमाणे यातील आरोपीतांनी संगणमत एकुण 10 गौवंश जनावरे आखुड दोराने निर्दयतेने बांधुन गाडीत कोंबलेल्या अवैधरित्या मिळून आले , ती जनावरे कत्तलखान्यात कत्तली करीता येवून जात असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले .
राष्ट्रीय महामार्ग 44 रोडवर एका आयशर वाहन क्रमांक एमएच 48 सी.क्यू 5808 मध्ये 10 गौवंश जातीचे जनावरे प्रत्येक किंमत 20 हजार असा एकूण 2 लाख रुपये व आयशर गाडीची किंमत अंदाजे 10 लाख असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीची यातून पोलीस पथकाने पंचनामा कारवाई करून वरील प्रमाणे माल पंचासमक्ष जप्त केला पंचनाम्याप्रमाणे कारवाई करून आरोपीना ताब्यात घेतले व जनावरांची चारापाण्याची व्यवस्था करण्या करिता गोवंश विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार (रामटेक) यांच्या सुपुर्त करण्यात आले .
स्थानिक गुन्हे शाखा (एलसिबी) नागपूर ग्रामीण पोलिसांनी कन्हान पोलिस ठाण्यात आरोपीना स्वाधिन करीत कन्हान पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 11 (1), (ए), (डी), (ई), (एफ), (आय), प्राणी.छळ.प्रतिबंध. अधिनियम सह कलम 5 (1), (2), म.प्राणी प्रतिबंध अधिनियम 109, 34 भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार , अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले , यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे ,पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे , सहायक फौजदार नाना राउत , पोलीस हवालदार विनोद काळे , इकबाल शेख ,संजू भदोरिया , चालक पोलीस हवालदार मोनू शुक्ला , पोलीस अंमलदार निलेश इंगुलकर यांच्या पथकाने केली.