नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पौद्दार (भा.पो.से.) यांचे आदेशाने अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेकरीता एक विशेष पथक तयार करण्यात आले असुन हे पथक अवैध धंदयावर रेड कामी दिनांक ०४/१०/२०२३ रोजी खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिल्लेवाडा येथील गोपाल पांडे नावाचा इसम हा विनापरवाना आपले ट्रक व्दारे रेतीची चोरटी वाहतुक करणार आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथील चेमरी गेट समोर बँक ऑफ इंडीया एटीएम समोर नाकाबंदी करीत असतांना ट्रक क्रमांक एम. एच. ४० / सी. ए. ७८७३ संशयितरीत्या येतांना दिसले. ट्रकचालकाला त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव १) राहुल मोरेश्वर मेश्राम, वय ३३ वर्ष, रा. बिना संगम तालुका कामठी २) शुभम शेषराव मेश्राम, वय २६ वर्ष, रा. वारेगाव तालुका कामठी असे सांगितले. त्यांच्या ट्रकची पाहणी केली असता ट्रक क्रमांक एम. एच. ४० / सी. ए. ७८७३ मध्ये विनारॉयल्टी रेती भरून दिसुन आले. त्याबाबत ट्रकचालक राहुल मोरेश्वर मेश्राम यांना रेतीचे परवान्यावाबत विचारपुस केली असता सदर रेती ही ३) गोपाल सत्यदेव पांडे, व २८ वर्ष, रा. सिल्लेवाडा ता. सावनेर याचे सांगणेवरून तामसवाडी पाटावरून रेती विनापरवाना खापरखेडा येथे घेवुन येत होतो असे सांगितले, सदर आरोपी हे आपल्या वाहनामध्ये विनापरवाना ५ ब्रास रेती किमती ३०,०००/- रु. ची भरून चोरटी वाहतुक करीत असल्याचे दिसुन आल्याने आरोपीतांच्या ताब्यातून ट्रक क्रमांक एम. एच.- ४० / सी. ए. ७८७३ किंमती अंदाजे २०,००,०००/- रू., विवो कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल विवो १८११ ज्यामध्ये जिओ कंपनीचा सिम कार्ड किंमती अंदाजे ६०००/- रु. सॅमसंग कंपनीचा निळसर रंगाचा मोबाईल मॉडेल नंबर गॅलेक्सी ए १० सी ज्यामध्ये जिओ कंपनीचा सिम कार्ड किंमती ८,०००/- रु. असा एकूण २०,४४,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोहवा नारायण भोजराम भोयर, मा. पोलीस अधीक्षक ना. प्रा. यांचे तात्पुरती विशेष पोलीस पथक यांचे रोपोर्टवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथे आरोपीताविरुद्ध कलम ३७९. १०९, ३४. भादवी कलम ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीतांना सुचनापत्रावर रिहा करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार राउत व नं. ४७८ पोस्टे खापरखेडा हे करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडे, पोलीस हवालदार नारायण भोयर,निलेश विजवाड, पोलीस अंमलदार, निखील मिश्रा यांनी पार पाडली.