– वाठोडा पोलीसांची कामगिरी
नागपूर :- दिनांक १४,०१,२०२४ से ०६.३० वा. चे सुमारास, फिर्यादी अनिल बबनराव ब्रम्हे वय ५३ वर्ष रा. ओमनगर, तिरंगा चौक, सक्करदरा नागपूर हे तहसिल कार्यालय मंडल अधिकारी असून ते पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत, बहादुरा फाय, उमरेड रोडवर अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत असतांना एक चालक आरोपी क. १) अशरफ खान एलाई खान वय २९ वर्ष रा. रजा मस्जिद मागे, खरवी, नागपूर आरोपी क. २) ट्रक मालक जावेद खान हमीद खान वय ३२ वर्ग रा. बाबा फरीद नगर, यांनी पाच ते सहा अनोळखी इसमांना बोलावुन गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादीस शासकीय काम करण्यापासुन रोखण्याचे उद्देश्याने फिर्यादीस वेडा घालुन शिवीगाळ केली व जिवानीशी ठार मारण्याची धमकी देवुन, नंवर प्लेट नसलेले केटा व ब्रेला वाहनांनी पळून गेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि, बगमारे ९८९०२०१८६१ यांनी आरोपीविरूध्द कलम १४३, १४७, १४९, ३३२, ३५३, ५०४, ५०६ (य) भा.द.वि, सहकलम ४८, ७ जमीन महसुल अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी क. १ व २ यांना अटक करण्यात आली होती.
तपासाचे दरम्याने आरोपी क. १ व २ यांना अटक करून तपासाचे दरम्यान त्यांचे इतर साथीदारांचे नांव निष्पन्न करून त्यांचा अभिलेख तपासला असता त्यांचे विरूध्द यापूर्वी सुध्दा वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले. सदर गुन्हयात सर्व आरोपीतांनी टोळी करून स्वतःचे व टोळीतील सदस्यांचे आर्थिक फायद्यासाठी वाळू तस्करी करीत असल्याचे तसेच लोकसेवकांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे सरकारी कामात व्यत्यय निर्माण करून दहशत निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९१ अंतर्गत प्रस्ताव तयार करून मा, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रभाग, नागपूर शहर यांचेकडे सादर केला असता दिनांक १९. ०१.२०२४ रोजी सदर गुन्हयास मकोकाची कलमे लावण्याबाबत मंजुरी दिली असता, दिनांक १९,०१,२०२४ रोजी सदर गुन्हयात मकोका अंतर्गत कलम वाढ करण्यात आली.
नागपूर जिल्हयामध्ये वाळू तस्करी करणारे अनेक टोळया असून ते अवैद्य गौण खनीज चोरी करून शासनाचे नुकसान करीत आहे, अशा वाळू व इतर गौण खनीज चोरी करण्याच्या टोळयांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई हो पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आदेशान्वये सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रभाग, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क. ४, यांचे मार्गदर्शनात श्री विश्वनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वाठोडा व त्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.