सहकार विभागाची कारवाई घरातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

गडचिरोली :- जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा गडचिरोली या कार्यालयास प्राप्त़ तक्रारीचे अनुषंगाने, गडचिरोली – चामोर्शी रोडवरील संशयीत अवैध सावकार योगेश महेंद्र रणदिवे यांचे प्रतिष्ठानावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये विद्यमान जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा गडचिरोली व्ही. पी. सहारे यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक नेमुण दिनांक 03 डिसेंबर 2024 रोजी सहकार विभागाने धाड टाकली. सदर धाडीमध्ये अनेक आक्षेपीत तथा नियमबाहय दस्तऐवज/कागदपत्रे (कोरे चेक, मुळ करारनामे, पैशाचे बदल्यात मालमत्ता खरेदी करारनामा इत्यादी) आढळुन आलेली असुन, ती पुढील नियमबाहय कारवाई करीता जप्त़ करण्यात आलेली आहे. सदर धाडसत्रात पथक प्रमुख एच. जी. सौलाखे, तथा कर्मचारी डी. एस. बनसोड, हेमंत जाधव, प्रशांत गटकोजावार, सौ.अनिता हुकरे, एस.एम.वैद्य तथा पोलीस कर्मचारी यांनी मदत केली. तसेच सदर धाडीमध्ये जप्त़ करण्यात आलेल्या कागदपत्रासंबंधाने अधिक चौकशी तथा पुढील कायदेशीर कार्यवाही करीता चौकशी समिती नियुक्त़ करण्यात आलेली. असुन, सदर समिती सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन पुढील कारवाई सदर समिती करणार आहे.

तसेच, बेकायदेशीर सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,गडचिरोली तसेच तालूकास्तरावर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विक्रमादित्य सहारे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे व्यवसायासाठी मिळणार ५० लाखापर्यंतचे कर्ज 

Mon Dec 9 , 2024
गडचिरोली :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावी म्हणुन एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येते सदर योजने अंतर्गंत गरजु व पात्र लाभार्थांना रू.5.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत विविध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते प्रकल्प रक्कम 5.00 लाख ते 50.00 लाख पर्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!