नागपूर :- दिनांक १३/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. मौदा हद्दीतील माथनी शिवारात अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मुखबीर कडुन मिळालेल्या माहितीवरून माथनी शिवारात मोहफुल गावठी भट्टीवर रेड केली असता फारार आरोपी नामे- रोहीत पुरूषोत्तम वाढवे रा. वडोदा तह मौदा जि. नागपूर या नावाचा इसम दगड विटाच्या चुलीवर अवैधरीत्या मोहफुल गावठी दारूची भट्टी तयार करून दारू काढत असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण येथील स्टाफने नमुद घटनास्थळी अवैध मोहाफुल दारू भट्टीवर छापा मारून १) ३००० हजार लीटर मोहफुल सडवा रसायन एकूण किमती अंदाजे ०७ लाख ५० हजार रु. २) मोहफुल दारू गाळण्याचे इतर साहित्य किंमती ०१ हजार ५० रु. असा एकूण ०७ लाख ६० हजार ५० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे मौदा येथे अप. क्र. ७३८/२०२३ कलम ६५ (ई) (क) (फ) (ब) मा. का. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जात मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे सपोनी अनील राऊत पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, इकबाल शेख पोलीस नायक संजय बरोदिया चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.