नागपूर :-पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून दि. ०७/०९/२०२३ रोजी पो.स्टे.. खापा हद्दीतील पंजाबराव खैरी गावाजवळ खैरी नाला जवळ बेवारस सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या ९० ब्रास रेतीचा साठा दिसुन आल्याने अवैध रेतीचा साठा ठेवणाऱ्या इसमांविरूद्ध रेड कारवाई करून पंजाबराव खैरी नाला जवळ सुमारे ९० ब्रास रेतीचा अवैध साठा किमती अंदाजे २,३४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमालाचे पत्र मोक्यावर तलाठी यांना देऊन दंडात्मक कायदेशीर कारवाई करीता तहसीलदार, तहसील कार्यालय सावनेर यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार आशिष मुंगळे, राजेंद्र रेवतकर, पोलीस नायक किशोर वानखेडे, आशिग भुरे यांचे पथकाने केली.