संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- जगतगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान अंतर्गत जिल्हा सेवा समिती नागपुर व तालुका सेवा समिती पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन रक्तदान शिबीराची सुरूवात करण्यात आली. लाईफ लाईन ब्लड बैंक च्या डॉ. प्रीती बांबल, डॉ. प्रविण साठवणे, नरेश सहारे, खुशबु ऊके, पुजा झमझाड, वैशाली कानेकर सह चमुंच्या सहकार्याने एकुण १०६ रक्तदा त्यांनी रक्तदान केल्याने रक्तदात्यांना बॅग, स्कॅब्स देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिबीरात नागरिकांच्या बीपी, शुगर ची तपासणी करण्यात आली. भव्य रक्त दान शिबीराच्या यशस्वितेकरिता मेघराज पांडे, निलेश शेळके, प्रेशित चकोले, आयुष डडूरे, प्रथमेश राऊत, शुभम डोणेकर, संदीप बंड, क्रिष्णा पाटील, रोहित वैध, रामेश्वर नागपुरे, अस्मिता नागपुरे, मोणाली चकोले, सिमा शेळके, भैरवी कावळे, सुनिता आकरे, अनिता मोकरकर, सुनंदा मेश्राम सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.