बुट्टीबोरी येथे तेल सदृश्य मुद्देमालाची वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

बुट्टीबोरी :- कोविंग ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाणे बुट्टीबोरी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर खबर दिली कि. ०१ इसम टाटा इंडिका वाहन के MH ३१ / CP ५८२२ ने स्वतः जवळ चोरीचा मुद्देमाल तेल सदृश्य मुद्देमालाची वाहतूक करीत आहे. अशा प्राप्त खबरेची शहानिशा करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नमुद घटनास्थळी नाकाबंदी सुरु केली असता आरोपी नामे असिफ अब्दुल्वाफा सिद्दीकी, वय २७ वर्ष, रा. कलमना नागपुर यांचे वाहन नाकाबंदी दरम्यान तपासण्यात आले असता त्याचे जवळ २४० लिटर तेल सदृश्य मुद्देमाल मिळून आला. आरोपीचे ताब्यातुन १) २४० लिटर तेल सा मुद्देमाल किंमती अंदाजे २४,०००/- रु. २) टाटा इंडिका वाहन MH ३१ CP ५८२२ किंमती अंदाजे १,००,०००/- रु. असा एकूण १,२४,००० /- रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे बुट्टीबोरी येथे कलम ४१ (१) (ड) जा.फौ. सहकलम १३० / १७७, ३९१ ) /१८१ मोबाका. अन्वये इस्तगासा दाखल करण्यात आला असून संबंधित कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, पोलीस हवालदार मिलिंद नांदुरकर, मयूर डेकळे, पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे तालेवार, पोलीस शिपाई राकेश तालेवार, चालक पोलीस शिपाई सुमित बांगडे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाऱ्या आरोपीताविरूध्द गुन्हा दाखल

Tue Jul 18 , 2023
कुही :- पो.स्टे. कुही परिसरात फिर्यादीची पत्नी वय ४३ वर्ष व एक मुलगा व एक मुलगी असा त्याचा परीवार असुन फौर्यादीची पत्नी ही बचत गटाची सदस्य असुन बचत गटातील इतर महीलांकडुन पैसा जमा करीत असते. घटना वेळी व ठीकाणी फिर्यादीची पत्नी ही फिर्यादीच्या स्वतःच्या परमात्मा पशु खादय व किराणा दुकान येथे हजर असताना दोन तीन महीला आरोपी क्र. १) व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com