खापा :- पोलीस स्टेशन खापा चे स्टॉफ हे सरकारी वाहनाने लाकुड चोरी व दारूची अवैध वाहतुकी संबंधाने मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असता बडेगाव ते खापा रोडने एक मालवाहु वाहन अतिवेगाने समोर जातांना दिसले, सदर वाहन संशयास्पद दिसल्याने त्या वाहनास ओव्हरटेक करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालक यांनी त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन खापा रोडने जात असता, सदरचे वाहनाचा पाठलाग केला असता वाहन चालक व त्याचा साथीदार हे खापा रोडवरील बावनगाव बसस्टॉफ येथे टाकुन वाहन सोडुन पसार झाले.
सदर वाहनाची बारकाईने तपासणी केली असता वाहन क एम एच ४० सीडी ८५५८ या वाहनाचे मागच्या डाल्यात जंगलातील कोणत्यातरी मौल्यवान प्रजातीचे झाडांचा गोलाकार कापलेला लाकुड फाटा भरलेला दिसला. तसेच एक प्लास्टीक डबकीत अंदाजे ७ लीटर व दोन प्लास्टीक बॉटलमध्ये ४ लीटर गावठी मोहाफुल दारू असल्याचे दिसले. तसेच वाहनाचे कॅबीनमध्ये एका प्लास्टीक थैलीत लाला मिर्ची पावडर दिसुन आले. सदर लाकुडची मोजणी केली असता किमती ५०,०००/रू ची लाकडे व ११ लीटर मोहाफुल गावठी दारू किमती ५५०/-रू ची एक मोठी ताडपत्री किमती २५००/- रू व एक मालवाहू वाहन क एम एच ४० सीडी ८५५८ किमती ६,००,०००/- रू असा एकुण किमती ६,५३,०५०/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन खापा येथे ३०३(२), ३(५), भारतीय न्याय संहीता सहकलम ६५ (अ) ई, ८३ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही हर्ष ए. पोहार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, अनिल म्हस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग तथा सहा पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल गिरी, पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम व पोलीस अंमलदार बटाउवाले यांनी पार पाडली.