परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्या ३१८४ विक्रेत्यांवर कारवाई

ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान १२७३६०० रुपये दंड वसूल : उपद्रव शोध पथकाची मोहीम सुरूच

नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका पूर्णतः कार्यरत आहेत. त्याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून परिसराचे विद्रुपीकरण करीत उपद्रव पसरविणाऱ्यांविरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे कठोर पाऊल उचलल्या जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते व वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्ती व्यावसायिक रस्त्यावर कचरा टाकत परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. गत ११ ऑक्टोबर ते ११ जानेवारी दरम्यान हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते अशा ३१८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेत्यांकडून उपद्रव शोध पथकाद्वारे प्रत्येकी ४०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. या ३१८४ जणांकडून १२ लाख ७३ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत. याशिवाय वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्ती व्यावसायिक रस्त्यावर कचरा टाकत परिसर अस्वच्छता पसरविणाऱ्यां ३३ जणांवर कारवाई करीत प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे ३३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. दोन्ही कारवाईमध्ये एकूण १३ लाख ०६ हजार ६०० रुपयांना दंड वसूल करण्यात आला आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. नागपूर शहराला राहणीमानाच्या दृष्टीने उत्तम शहर साकारण्यासाठी महानगरपालिका कार्यरत आहे. नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी मनपाद्वारे विशेष पाऊल उचलल्या जात आहेत. विविध उपाय योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न मनपाचा आहे. असे असताना शहरात अस्वच्छता पसरवून परिसर घाण करणाऱ्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे  धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवानांसोबत अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर धडक कारवाई करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Batch - 3 : Some more glimpses of Full Dress Rehearsal of Republic Day Parade 2023, at Kartavya Path on January 23, 2023.

Tue Jan 24 , 2023
(Batch – 3): Some more glimpses of Full Dress Rehearsal of Republic Day Parade 2023, at Kartavya Path on January 23, 2023. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!