विना परवाना वाळु चौरट्यावर कारवाई, कन्हान पोलिसांचा दंणका..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – पोस्टे अंतर्गत अवैद्यरित्या कन्हान नदीतुन वाळु चोरून साठवणुक करून छोटा हाती वाहणात भरून विना परवाना विक्री करण्या-याना पकडुन कन्हान पोलीसानी तीन लाख साठ हजार पन्नास रूपयाचा मुद्देमाल जप्त करित तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवार (दि.५) एप्रिल ला १० वाजता कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलींग करित असताना उमेश यादव रा. कन्हान पार्टनरशिप मध्ये कन्हान ते तारसा रोडवरील वाघधरे वाडी येथे ख्वाजा गरीब नवाज ट्रेड र्स बिल्डींग मटेरिअल सप्लायर्स च्या पाठीमागे लहान-मोठ्या वाहनाने नदीतुन वाळु बोरीत गोळा करून अवै धरित्या वाळु साठवणुक करून विना परवाना विक्री करित असतो. अशा माहितीवरून वाघधरे वाडी येथे ११ वाजता दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाोहचुन बिल्डींग मटेरिअल सप्लायर्सच्या पाठीमागे एक युवक टाटा एस (छोटा हाती) वाहनात घमेला व पावड्याने खाली जमीनीवर साठवणुक असलेली वाळु भरून गाडी भरित असतांना आढळुन आला. पोलिसांनी अचानक छापा मारून युवका सह वाहनास ताब्यात घेतले. गणेश कंठीराम देशमुख वय ४८ रा. वार्ड नं. ४ कांन्द्री, एमएच.४० बिएल ०१७१ चा चालक व मालक यांच्या ताब्यातील वाहनाची बारकाईने पाहणी केली. एक क्रीम रंगाची टाटा एस (छोटा हाती) वाहनात वाळु व घटनास्थळी जमीनीवर अंदाजे १०८८ /९८७७ फुट (१ ब्रास) जमीनीवर साठवणुक केल्याचे दिसुन आली. वाळु बाबत रॉयल्टी विचारली असता त्यांनी नसल्याचे सांगितले. तसेच साठवणुक केल्या सबंधात महसुल विभागाचा परवाना सुद्धा नसल्याचे सांगितले. यातील आरोपींनी संगणमत करून, विकी बोढे रा. पिपरी आणि उमेश यादव रा. कन्हान यांनी वाहन मालक गणेश कंठीराम देशमुख यांचे मालकीचे वाहनात विना रॉयल्टी वाळु भरून विक्री साठी जाणार असल्याचे आढळुन आल्याने कन्हान पोलीसानी टाटा एस (छोटा हाती) किमत ३,५०,००० रूपये, अंदाजे 35 फुट रेती किमत १७५० रूपये, एक मोबाईल किमत ८, ००० रू. व घमेला व पावडा किमत ३०० रू. असा एकुण ३,६०, ०५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून तिघा विरूद्ध कलम ३७९, १०९ , ३४ भादंवि. संहीता१८६० , सहकलम ४८(७), ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मोठया भावाने विट मारून लहान भावाचे डोके फोडले. 

Sat Apr 6 , 2024
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र. ३ येथील रहिवासी शेखर मस्के यांचे मोठे भाऊ नारायण मस्के याने दारूच्या नशेत शिविगाळ करून लहान भावाच्या डोक्यावर विट मारून डोके फोडले आणि शिविगाळ करून मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करित आहे. शेखर गुलाब मस्के वय ४८ वर्ष रा. वार्ड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com