संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र. ३ येथील रहिवासी शेखर मस्के यांचे मोठे भाऊ नारायण मस्के याने दारूच्या नशेत शिविगाळ करून लहान भावाच्या डोक्यावर विट मारून डोके फोडले आणि शिविगाळ करून मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करित आहे.
शेखर गुलाब मस्के वय ४८ वर्ष रा. वार्ड क्र. ३ कांद्री बसस्टँप जवळ तह पारशिवनी जि नागपुर याचा मोठा भाऊ नारायण गुलाब मस्के वय ५१ वर्ष हा दारू पिण्याच्या सवईचा असुन दारू पिवुन नेहमी शिविगा ळ करून झगडा भांडण करत असतो. त्याचे या त्रासा ला कंटाळुन त्याची पत्नी त्याला सोडुन माहेरी निघुन गेल्याने चौदा वर्षा पासुन तो एकटाच राहतो. शुक्रवार (दि.५) एप्रिल २०२४ ला रात्री ९ वाजता सुमारास शेखर मस्के घरी हजर असताना त्याचा मोठा भाऊ हा दारूच्या नशेत शिवीगाळी करित होता. तेव्हा त्याला तू शिवीगाळी करू नकोस काय बोलायचे आहे ते सका ळी बोलु असे म्हटले असता मोठा भाऊ नारायण मस्के याने विट हातात पकडुन डोक्यावर मारल्याने शेखर च्या डोक्यातुन रक्त निघाले तरी त्याने शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. नारायणने विट मारल्यामुळे माझ्या डोक्यातुन रक्त निघत असल्याने शेखरच्या पत्नीने त्यास औषधोपचारा करिता खाजगी दवाखाना कांद्री येथे नेऊन सध्या उपचार सुरु आहे. कन्हान पोलीसानी फिर्यादी शेखर मस्के यांचे बयाणावरून त्याचा मोठा भाऊ नारायण मस्के विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.