मौदा :- मौदा पोलीसांचे पथक पोस्टे हटीत पेट्रोलींग करीत असताना माहीती मिळाली की, एक इसम ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने रेती भरुन चोरटी वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनीय माहीती वरून मौदा पोलीसांनी नाकाबंदी केली असता मौजा आजनगाव शिवार, ता. मौदा येथे एक सिल्व्हर रंगाचा क्रमांक नसलेला आयसर कंपनीचा ट्रॅक्टर व एक लाल रंगाची विना क्रमाकाची ट्रॉली मध्ये आरोपी नामे- पवन अर्जुन चौधरी, वय २८ वर्ष, रा. धामनगाव ता. मौदा जि. नागपूर हा आपले ताब्यातील ट्रॅक्टरच्या साह्याने ट्रॉली मध्ये सांड नदीचे पात्रातुन अवैधख्यिा विनापरवाना रेती चोरी करून वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून १) एक सिल्व्हर रंगाचा क्रमांक नसलेला आयसर कंम्पनीचा ट्रैक्टर किंमती ७०००००/-रू चा २) एक लाल रंगाची विना क्रमाकाची ट्रॉली किंमती १०००००/- रु ३) एक ब्रास रेती किंमती ५०००/-रू. असा एकूण ८०५०००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला असुन सदर विनाक्रमांकाची ट्रैक्टर ट्रॉली बालक आरोपी नामे पवन अर्जुन चौधरी, वय २८ वर्ष, रा. धामनगाव ता. मौदा जि. नागपूर यांच्या विरूध्द पो.स्टे. मौदा येथे अप. क्र. ११५/२४ कलम ३७९ भा.दं.वी सहकलम ४८(८) महा. जमीन महसुल अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोहार, अपर पोलीस अधिक्षक रमेश घुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर तसेच पोलीस स्टेशन मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीषसींह राजपुत, पोलीस हवालदार संदीप कडू, गणेश मुदमाळी, रूपेश महादुले, पोलीस नायक दीपक दरोडे यांनी केली.