वर्षभरात ५८८५५ उपद्रवींवर कारवाई, उपद्रव शोध पथकाची कामगिरी : स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूरसाठी मनपाचे पाऊल

नागपूर : नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे असे आवाहन नागपूर महानगरपालिका सतत करीत असते. तरीही काही व्यक्तींकडून सतत नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा व्यक्तींवर निर्बंध घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नियमित कारवाई सुरू आहे. शहरात केलेल्या विविध कारवाई अंतर्गत उपद्रव शोध पथकाने वर्षभरात तब्बल ५८८५५ उपद्रवींवर कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये झालेल्या या कारवाईतून ६,५९,५८,७५० रूपयाचा दंड वसूल झालेला आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात वर्षभरात दहाही झोन पथकाद्वारे ही करवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधित उपद्रव शोध पथकाद्वारे केलेल्या विविध कारवाईत सर्वाधिक दंड मंडळ, कमान स्टेज किंवा वैयक्तिक कामामुळे वाहतुकीचा रस्ता बंद करणा-यांकडून वसूल करण्यात आला. वर्षभरात वाहतूक रस्ता बंद करणा-या १९५९४ जणांवर २,१९,७९,८५० रुपये दंड ठोठावण्यात आला.

याशिवाय हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परीसरात अस्वच्छता करणाऱ्या ८८०९ उपद्रवींकडून ३५,२३,६००, सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणा-या ७३९ उपद्रवींकडून १,४७,८०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी किंवा उघड्यावर मुत्र विसर्जन करणा-या २३२ उपद्रवींकडून १,११,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय व्यक्ती, दुकानदार, शैक्षणिक संस्था, दवाखाने, इस्पीतळे, पॅथलॅबद्वारे मोकळ्या जागेवर किंवा फुटपाथवर आणि मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटर्स सर्व्हिस प्रोव्‍हायडर, चिकन, मटन विक्रेते यांच्याद्वारे कचरा टाकल्यास उपद्रव शोध पथकाने कारवाई केली आहे. अशा ३६०४ व्यक्तींकडून ३,६०,४०० रूपये, १९०९ दुकानदारांकडून ७,६३,६०० रुपये, ७० शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेसकडून ७०,००० रुपये, ३२ दवाखाने, इस्पितळे आणि पॅथालॅबकडून ६४,००० रूपये आणि मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटर्स सर्व्हिस प्रोव्‍हायडर ४८४ उपद्रवींकडून ९,६८,००० रूपये तसेच ५९ चिकन, मटन विक्रेत्यांकडून ५४,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

शहरात विना परवानगी जाहिरातीचे फलक, बॅनर लावण्यासाठी १६७ जणांवर कारवाई करून ६२१,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ किंवा मोकळ्या जागेवर जनावरे बांधणाऱ्या ४२ उपद्रवींकडून ४२,००० रूपये, सार्वजनिक ठिकाणी जनावरे/वाहने धुवून परिसर अस्वच्छ करणाऱ्या ५४ उपद्रवींकडून ५४००० रूपये, रस्ते, वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकण्यासाठी ८५ वैद्यकीय व्यवयासींवर कारवाई करीत २६,६०,००० हजार रूपये, वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्‍यवसायीकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासाठी ११२ कारवाईत १,१२,००० रूपये दंड वसूल करण्यात आला.

उपद्रव शोध पथकाने एक वर्षात सार्वजनिक रस्त्यावर, फुटपाथवर विना परवानगी बांधकाम साहित्य साठविणाऱ्या ९१४६ व्यक्तींनी प्रथम नोटीस नंतरही ४८ तासात साहित्य न हटवल्याने त्यांच्यावर कारवाई करून तब्बल १,८२,९२,००० रुपये दंड वसूल केला तर २८० बिल्डरकडून २८,००,००० रूपये, सार्वजनिक ठिकाणी इमारतीचा मलबा, टाकाउ कचरा टकण्यासाठी केलेल्या ३७७ कारवाईत १२,०६,००० रूपये, इतर उपद्रवांसाठी ८१६० व्यक्तींवरील कारवाईत १६,३२,००० रूपये आणि ३५५५ संस्थांकडून ३५,५५,००० रूपये, सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळण्यासाठी ११० जणांकडून ९३,८०० रुपये, हरित लवाद यांनी दिलेल्या दिनांक ०३.०७.२०१७ च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्सवरील ४२ कारवाईत ६,१७,००० रूपये, प्रतिबंधित प्लास्टिक वापराबद्दल ११७६ जणांवर कारवाई करून ६२,१०,००० रुपये आणि मनपा मुख्यालय परिसरात नो पार्कींगमध्ये वाहन लावलेल्या एका व्यक्तीवर कारवाई करून २०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

मागिल एक वर्षातील झोननिहाय कारवाई

उपद्रव शोध पथकाने दहाही झोनमध्ये एकूण ५८८५५ कारवाई करण्यात आल्या. यामध्ये

झोन                        कारवाई            दंड वसूल

लक्ष्मीनगर झोन क्र. १    ८६९१           ७४,००,९५०

धरमपेठ झोन क्र. २.       ४७११          ७७,७७,३००

हनुमान नगर क्र. ३         ५५०८           ५७,०३,२००

धंतोली झोन क्र. ४       ५२३६              ७४,८३,९००

नेहरूनगर झोन क्र. ५.     ४३२१             ६०,२२,४००

गांधीबाग झोन क्र. ६      ७३४७                 ७५,८२,८००

सतरंजीपूरा झोन क्र. ७   ४२७८               ५४,१६,१००

लकडगंज झोन क्र. ८      ४११४.                   ५५,०५,९००

आशीनगर झोन क्र. ९      ६१३४                    ७०,३५,५००

मंगळवारी झोन क्र. १०    ८५१५                   ६०३०७००

 

एकूण –                   ५८८५५.              ६,५९,५८,७५०

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालेय क्रीडा कला एव सांस्कृतिक उत्सव उत्साह मे संपन्न

Sat Feb 4 , 2023
हमारी पाठशाला विद्यामंदिर एवं अरिहंत पब्लिक स्कूल का संयुक्त उपक्रम नागपुर :- श्री कुंदकुंद शिक्षण संस्था द्वारा संचालित हमारी पाठशाला विद्यामंदिर एवं अरिहंत पब्लिक स्कूल नागपुर द्वारा हाल ही में क्रीडा कला एवं सांस्कृतिक महोत्सव संपन्न हुआ, शाला अंतर्गत कबड्डी- खो खो – लंगडी आदि मैदानी खेल मे 150 विद्यार्थियों ने भाग लिया, ज्ञान विज्ञान प्रतियोगिता में शाला के सभी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com