खापरखेडा :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर खापरखेडा येथे दिनांक १५/०१/२०२४ ने १८/०० वा. ते १९/०० वा. दरम्यान फिर्यादी आपले स्टाफसह पोस्टे परिसरात प्रोवीशन जुगार रेड करीत असताना गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीवरून यातील आरोपी नामे १) आर्यन संदीप फुलझरे, वय १८वर्ष २) संतोष हिरालाल गुप्ता, वय ५० वर्ष दोन्ही रा. वार्ड क्रमांक ०३ खापरखेडा हे आपल्या घरी ५ चक्री नायलॉन मांजा प्रत्येकी अंदाजे किंमती ५००/- रू. प्रमाणे असा एकूण २५००/-रू. नायलॉन मांजा लपवून विक्री करीत असल्याचे दिसून आल्याने सदरच्या दोन्ही आरोपी विरुद्ध पोस्टे खापरखेडा येथे अप. क्रमांक २४/२०२४ कलम १८८, ३४ भादंवी सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तसेच पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील पाटणसावंगी येथे नितीन जनरल स्टोअर्स येथे लपून छपून नायलॉन मांजा व गुंजी विक्री करीत आहे. अशी गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे नितीन उर्फ अतुल विठ्ठल शंभे, रा. वार्ड नं ५ पाटणसावंगी याचे दुकानाची झडती घेतली असता दुकानात प्रतिबंधित ३ नायलॉन मांज्याच्या चक्री व १२ नग गुंजी असा एकूण ४१००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी नितीन विठ्ठल शंभे, वय ४५ वर्ष, रा. पाटणसावंगी याचे विरुध्द ५. १५ पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ सह कलम १८८ भादेवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.