जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई

देवलापार :- अंतर्गत १४ किमी अंतरावर मौजा मानेगावटेक शिवार येथे दिनांक ०२/१०/२०२३ चे २०.३० वा. ते २१.४० वा. दरम्यान देवलापार पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा मानेगाव शिवार येथे एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवलापार पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता इक क्र. एम. एच. १४/ सि.पी.- ८३४९ हे संशयीत वाहन मिळून आल्याने त्या वाहना जवळ जावून त्याची पाहणी केली असता सदर वाहनात गौवंश जनावरांना अत्यंत क्रूर व निर्यदयतेने वाहनात डांबुन आखुड दोरीने पाय व तोंड बांधून चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीत अपुऱ्या जागेत कोंबुन कत्तलीसाठी अवैध्यरित्या घेवून जाताना मिळुन आल्याने त्याच्या ताब्यातून २४ नग पांवच्या रंगाचे बैल गोवंश प्रत्येकी किमती १०,०००/- प्रमाणे किंमती २,४०,०००/- रु. जनावरे व २ गौवंश बैल मृत किंमती ०० रु. असा एकूण २४००००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून अशा एकुण २४ बैल गौवंश यांना गौशाळा येथे दाखल करण्यात आले आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोशि सचिन वेळकर व नं. २३३९ पोस्टे देवलापार यांचे रीपोर्टवरून पोस्टे देवलापार येथे फरार आरोपीविरुद्ध कलम २७९, ४२९ भादंवी सहकलम छळ प्रति. १६६० कलम ११(२) (जी), ११(१) (डी), ११(१) (सी), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिकारी १९९५ कलम ५ अ ९ म पो अधिनियम १९५१ कलम ११९ कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोस्टे देवलापार हे करीत आहेत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीस अटक

Thu Oct 5 , 2023
खापा :- दिनांक ०३/१०/२०२३ चे १६.०० वा. दरम्यान फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा वय १० वर्ष हा गुमगाव मार्डन येथे फुटबॉल खेळण्याकरीता गेला असता यातील आरोपी नामे- विशाल प्रभु जनबंधु वय २४ वर्ष, रा. गुमगाव माईन खापा याने फिर्यादीच्या मुलाला आपल्या स्कुटीवर बसवून चॉकलेट घेवुन देतो असे म्हणुन गुमगाव माईन च्या ग्राउंड च्या बाजुला असलेल्या जंगलात घेवुन गेला. फिर्यादीच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com