– पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरीची कारवाई
नागपूर:- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांचे आदेशाने पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी बोरी येथील स्टाफ दिनांक १७/०७/२०२३ रोजी नागपूर विभागात अवैध धंदे विरूद्ध कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, एक इसम पिपरडीह लामारी येथे इन्व्हेंटीस कंपनीच्या बाजुला लेबर लोकांसाठी राहणाऱ्या शेड मध्ये अंमली पदार्थ गांजाची ग्राहकांना विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणुक करून विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने नमुद ठिकाणी सापळा रचुन आरोपी नामे विश्णु केश्वर राजवार, वय ५२ वर्ष रा. पिपरडीह लामारी कला गढ़वा जि. झारखंड ह. मु. इन्व्हेंटीस कंपनीच्या वर्कर रूम मौजा सालईघाबा ता. हिंगणा जि. नागपुर त्याने अंग झडती मध्ये पॅटच्या उजव्या खिशात मोबाईल डाव्या खिशात एक प्लास्टिक पॅकेट मध्ये गुंगीकारक वनस्पती गांजा मिळुन आला. आरोपीच्या ताब्यातुन एकुण मुद्देमाल वजन ०.५९३ किलोग्रॅम गांजा किंमती अंदाजे ५९३० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला त्या गांजा बाबत विचारले असता सदर गांजा हा गावातुन नौकरी करीता नागपूरला येत असतांना त्याने आपल्या गावातुन आणला आहे असे सांगीतले.
सदर बाबत पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी येथे आरोपीविरुद्ध कलम ८ (क) ३० (ब) II (अ) एन. डी. पी. एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर राय, पोलीस नायक आशिग बोरकर, श्रीकांत गौरकर, पोलीस शिपाई निखील शेगावकर यांनी पार पाडली.