नागपूर :- पोलीस ठाणे तहसिल हद्दीत गोळीबार चौक, हनुमान मंदीर जवळील, एस.बी.आय ने एटीएम मधुन छेडखानी करून अज्ञात आरोपीने चोरी व नुकसान केल्याचे फिर्यादी स्वप्नील गभणे वय २६ वर्ष चैनल मॅनेजर, ईलेक्ट्रॉनीक पेमेंट सर्विस यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तहसिल येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३२४(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी नागपूर शहरात एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून तसेच गुप्त बातमीदाराने दिलेल्या सुबनेवरून सापळा रचुन वरून आरोपी १) सत्यवीर कहई सिंग वय २१ वर्ष रा. ईब्राहीमपूर, रेवाडी बुजूर्ग, ता. बेडकी, जि. फतेहपुर, उत्तर प्रदेश २) नाईजेरे आजमखान माहरूफ खान वय २४ वर्ष रा. हजरतगंज, ललौली, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपूस केली असता, आरोपींनी वरील चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतू सुध्दा एटीएम मधुन नोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींचे ताब्यातुन मोबाईल फोन, एटीएम मधुन पैसै काढण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या पट्ट्या व रोख ३००/- रू जप्त करण्यात आले आहे. आरोपींना पुढील कारवाईस्तव तहसिल पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), मा. सहा, पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.