युवा चेतना मंच तर्फे रनाळा येथील विविध बैंकेत जागतिक महिला दिन साजरा

– संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 8 :- युवा चेतना मंच तर्फे रनाळा येथील कामठी अर्बन निधी बँक येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले. याप्रंसगी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी बैकेच्या व्यवस्थापक संचालीका दिप्ती ठाकरे , कर्मचारी मोनाली वढे , भाग्यश्री पटले , साजीया शेख यांना सन्मानित करण्यात आले . सोबतच बँक ऑफ इंडीया मध्ये रनाळा शाखा प्रबधंक अर्चना गणवीर व समस्त महिला कर्मचारी यांना सम्मानित करण्यात आले . कॅनरा बँक मध्ये रनाळा शाखा चे प्रबंधक कविता कुशवाह , साहय्यक प्रंबधक ऋणु प्रधान व समस्त महिला कर्मचारी यांनाही सम्मानीत करण्यात आले. सोबतच युनियन बँक मध्ये महिला कर्मचारी पपीता पारधी , आरती बुरबांधे पूजा कुहीकर यांना सम्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन बाँबी महेंद्र व नरेश सोरते यांनी केले .याप्रसंगी अक्षय खोपे यांनी सुत्रसंचालन प्रस्तावणा प्रा.पराग सपाटे आभार प्रदर्शन नितीन ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता युवा चेतना मंच संदस्यानी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Tue Mar 8 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 8:- आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज मंगळवार ला प्रभाग क्र 2 येथील सय्यदानी नगर बकरा कमेला पुराना भोई पुरा येथे समाजसेवक मो.इरशाद शेख यांच्या वतीने आयोजित आधार कार्ड शिबीर ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरातून प्रभाग क्र 2 च्या अधिकाधिक नागरिकांनी आधार कार्ड अपडेट व नवीन आधार कार्ड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com