नागपूर :- फिर्यादी शाहनवाज सोहेल सलाम शेख वय ३५ वर्ष रा. वार्ड नं. ८. कोपरेपूरा, भिवापूर, जि. नागपूर हे त्यांचे पुतन्याचे वाढदिवस कार्यक्रमाकरीता स्वीपट डिझायर गाडीने पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत ऑटोमोटीव्ह चौक, कामठी रोड, के.एम.सी लॉन येथे आले व गाडी पार्क करून लॉनचे आत गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे तसेच त्यांचे गाडीचे बाजुला असलेल्या स्वीफ्ट गाड़ी मधून बॅटरी चोरून नेल्या. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भाल्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात पाचपावली पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे रफीक खान वल्द वहिद खान वय ३९ वर्ष रा. ईब्राहीम लिडरचे घरा जवळ, औलीया नगर, मोठा ताजबाग, सक्करदरा, नागपूर यास ताब्यात घेवुन, विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन एकुण ११ वेगवेगळ्या कंपीच्या बॅटरी किंमती ७५,०००/- रू. व्या व गुन्हा करतेवेळी वापरलेली कार क. एम.एन.३१ डि.व्ही ०७०८ असा एकुण किंमती अंदाजे ६,७५,५००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी निमीत गोयल, पोलीस उप आयुक्त (परी. क. ३),अनीता मोरे, सहा. पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, बाबुराव राऊत, पोनि. हरीष काळसेकर, पोहवा, राजेश कोकाटे, पोअ. शाहनवाज मिर्जा, ओमप्रकाश बुरडे, मनोज चौधरी, शंकर आगडे, अनुज ठाकुर व संतोष शिवनकर यांनी केली.