संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– डॉ बाबासाहेब आंबेडरकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड ला अटक करा
– भाजप कामठी शहर चे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन
कामठी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलना दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या विरोधात भाजप कामठी शहरच्या वतीने निषेध आंदोलन करून भाजप अनुसूचित जाती आघाडी शहरध्यक्ष विक्की बोंबले आणि भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांच्या नेतृत्वात भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार गणेश जगदाळे यांना सोपवून आ जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची मागणी केली. गुरुवार दि ३० मे रोजी दुपारी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
केवळ मतांच्या राजकारणासाठी निवडणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा उदो उदो करायचा आणि निवडणुका झाल्यावर त्यांचा फोटो फाडून पायदळी तुडवायचा ? हेच राष्ट्रवादी कांग्रेस(शरद पवार ) गटाचे पुरोगामी विचार आहेत का असा प्रश्न उज्वल रायबोले यांनी केला असून बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ सत्याग्रह केला. त्याच पवित्र भूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून विकृत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची निच मानसिकता उघड केली. आपण काय चाळे करतोय याचे भान आव्हाडांना नाही असेही त्यांनी निषेध करतांना सांगितले.
निषेध करण्यासाठी शिष्टमंडळात भाजपा पदाधिकारी नरेश कलसे,राजेश खंडेलवाल,उज्वल रायबोले,माजी नगरसेवक लालसिंग यादव, प्रतिक पडोळे,श्रावण केळझरकर,प्रमोद वर्णम,तसेच राज हाड़ोती,हितेश तिरपुड़े,दिनेश खेडकर,अनिल पिंगळे, शंकर चवरे, मुकेश गोंडाने,प्रभा राऊत,रोशनी कानफाडे,भारती मेश्राम, अभिषेक कनोजे,विरेंद्र राऊत, गोपाल सोनानी, बालकदास सिंगाड़े,गणेश सायरे,ऋशी दहाट, सूरज बोरकर, सचिन शेंडे आदी भाजप कार्यकत्याचां समावेश होता .