कन्हान :- पोस्टे कन्हान येथील स्टाफ यांना गोपनीय माहिती मिळाली की, कन्हान ते गहूहीवरा रोड लगत रोहीत चौरसीया याच्या कोळसा टालवर चोरीचा कोळसा विक्री केला जात आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून कन्हान पोलीस स्टाफ व फिर्यादी यांनी घटनास्थळी पोहचुन मोसा क्र. एम.एच-४०/सी. व्ही-३३४९ चा चालक आरोपी क्रं. १) रोहीत किशोर सुर्यवंशी, वय १९ वर्ष, रा. खदान नं. ६ कन्हान, मोसा क्र. एम.एच-४०/सी. व्ही-१८९६ चा चालक आरोपी क्र. २) अरूण छग्गीलाल कश्यप वय २१ वर्ष रा. खदान नं. ६, मोसा क्र. एम.एच-४०/एस. -०६०९ चा चालक आरोपी क्र. ३) संजय पांडूरंग सिगने, वय ४० वर्ष रा. गोंडेगाव (न्यू), मोसा क्र. एम. एच-४०/यु.-२८७३ चा चालक आरोपी क्र. ४) पुतन बड्डा केवट वय १८ वर्ष रा. पाणी टंकी के पास खदान नं. ६ कन्हान, मोसा क्र. एम.एच-२७/ डी.एन-८७०५ चा चालक आरोपी क्र. ५) गुलशन भाष्कर मेश्राम, वय २५ वर्ष रा. खदान नं. ६ कन्हान यांनी आपापल्या मोटारसायकलवर कोळसा हा कामठी उपक्षेत्र ओसीएम येथुन चोरी करून यातील आरोपी क्रं. ६) रोहीत चौरसिया यांच्या कोळसा टालवर विकतांना पोलीसांना व फिर्यादी नामे- जितेन्द्र राजेन्द्रसिंग चव्हान वय २८ वर्ष (डब्लू सी एल गाईं) रा. लालओली तूमडीपूरा कामठी ता. कामठी जि. नागपूर यांना मिळुन आल्याने आरोपीतांकडुन असा एकुण कोळसा अंदाजे ९० टन ज्याची अंदाजे किंमती ७,००,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीतांविरूद्ध पोस्टे कन्हान येथे कलम ३०३(२), ११२ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपी क्र. ०१), ०२), ०३), ०६) यांना अटक करण्यात आली आहे. व आरोपी क्र. ०४) व ५) यांना सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कन्हान येथील ठाणेदार पोनि उमेश पाटील, सपोनि राहूल चव्हान व इतर स्टाफ यांनी पार पाडली.