नागपूर :- दिनांक २९,०५,२०२३ मे २०.३५ वा. से २२.०५ वा. च्या दरम्यान पोलीस ठाणे कोलनगर हद्दीत जैन किराणा स्टोर्स, एन. आय. डी क्वॉर्टर नारी रोड, कमीलनगर येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखूजन्य पदार्थ, विक्री करीता साठा करून ठेवल्याने खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी विजीत नागाचंद जैन वय ३५ वर्ष रा. एन.आय.टी. क्वॉर्टर नं. ६९, नारी रोड, कोलनगर, नागपूर यांचे ताब्यातुन विवध प्रकारचे सुगंधीत प्रतिबंधीत तंबाखू तसेच सुंगधीत पान मसाले बाबा, ब्लॅक सागर, शक्ती, रत्ना, बागवान, राजश्री गुटखा, रजनीगंधा, पानपराग, पानबहार, असा एकुण ५५.३२५/- चा मुद्देमाल मिळुन आला. मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे कमीलनगर येथे पोउपनि आशिष कोहळे यांनी दिलेल्या तकारीवरून कलम १८८,२७२ २७३, ३२८, भा.दं.वी सहकलम ५९, अन व सुरक्षा मानदे अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपींस मुद्देमालासह पुढील योग्य कारवाईस्तव कमीलनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) अर्चित चांडक, सहायक पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सारोन दुर्गे सपोनी जगदाळे, पोउपनि आशिष कोहळे, पोहवा रामचंद कारेमोरे, महादेव थोटे, प्रमोद वाघ, रामनरेश यादव, भीमराव बॉबल, टप्पलाल चुटे, शत्रुघ्न ठाकुर पो, निखील जामगडे, राजु कडकर, विशाल नागभीडे यांनी केली.
प्रतिबंधीत तंबाखु विकी करीता साठा करणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com