नागपूर :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत प्लॉट नं. ४६, त्रिलोक नगर, लोकमान्य शाळे जवळ, दत्तवाडी, वाडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी यश सुभाष बोरकर वय २५ वर्ष यांचे वडील नामे सुभाष गुलाब बोरकर वय ५५ वर्ष हे पोलीस ठाणे वाडी हद्दीत गडगाव रोड, डि.टी.डी. एस, कंपनीचे गोडावून समोर पानठेला चालवितात. दिनांक १५.१०.२०२४ चे १७. ३० वा. ते दि. १६.१०.२०२४ से १५.३० वा. चे दरम्यान फिर्यादीचे वडील हे घरी परत ना आल्याने, फिर्यादीचे मामा यांनी फिर्यादी यांना कळविले की, तुझे बायाचा खुन झाला आहे’, त्यावरून फिर्यादी यांनी जावुन पाहीले असता, फिर्यादीचे वडील हे पानठेल्या जवळ निपचीप पडुन त्यांचे डोक्याला मार लागल्याचे दिसुन आले. फिर्यादीचे वडीलांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणारून, त्यांचे डोक्यावर दगडाने मारून जिवानीशी ठार केले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम १०३(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू होता.
गुन्हयाचे तपासात वाडी पोलीसांचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे रोहीत बालकराम मालवी वय २६ वर्ष रा. खडगाव, आशिर्वाद नगर, मिशन इंडिया हॉस्पीटल जवळ, वाडी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने सांगीतले की, तो दयाराम अॅण्ड कंपनी येथे जे.सी.बी ऑपरेटर म्हणून काम करीत असुन, मृतक नामे सुभाष बोरकर याचे सोबत पैश्याचे उधारीवरून वाद झाला, भांडणात सुभाष बोरकर याने अश्लिल शिवागाळ केल्याने, त्याने मृतक नामे सुभाष बोरकर यांचे डोक्यावर काठी मारून गंभीर जखमी केले. नंतर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने बाजुला पडलेला दगड सुभाष बोरकर यांचे डोक्यावर मारून ठार केले. आरोपीने गुन्हा कबुल केल्यावरून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिवाजीराव राठोड, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग) नागपूर शहर, लोहीत मतानी, पोलीस उप आयुक्त (परी. क. ०१), सतिशकुमार गुरव, सहा. पोलीस आयुक्त (एम.आय. डी.सी. विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, राजेश तटकरे, पोनि. सोन्याबापू देशमुख, सपोनि, कुणाल धुरट, राहुल सावंत, पोहवा, तुलसी शुक्ला, प्रमोद गिरी, नापोअं, प्रविण फलके, राहुल बोटरे, हेमराज बेराळ, प्रमोद सोनवने, अजय पाटील, पोअ. सतिश येसकर, सोमेश्वर वर्षे व दुर्गादास माकोडे यांनी केली.