अनधिकृत भित्तीपत्रके लावणाऱ्या रिद्धी बिल्डर्सवर गुन्हा दाखल

चंद्रपूर :- शहरातील विविध शासकीय व खाजगी जागेवर घरकुल विक्रीबाबत जाहिरातीचे भित्तीपत्रके लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्या रिद्धी बिल्डर्सवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राम नगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार दि. १६ मे रोजी मनपा उपद्रव शोध पथकाने पाहणी केली असता वरोरा नका उड्डाणपूल,आंबेडकर कॉलेज उड्डाणपूल,जनता कॉलेज चौक,विजेचे खांब, रस्त्याच्या कडेची बाजु,झाडे तसेच मनपा हद्दीत विविध ठिकाणी शासकीय व खाजगी जागेवर घरकुल विक्रीबाबत जाहिरातीचे भित्तीपत्रके लावले असल्याचे आढळले.सदर भित्तीपत्रके ही रिद्धी बिल्डर्सतर्फे लावण्यात आली होती. याकरीता मनपातर्फे कुठल्याही स्वरूपाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली व महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ कलम ३ अंतर्गत रिद्धी बिल्डर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत. विशेषतः उड्डाणपुल,शासकीय इमारती येथे ” माझी वसुंधरा ” अंतर्गत मोठ्या प्रमाणात वॉल पेंटींगची कामे करण्यात आली आहे.चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग करण्यास राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवसुद्धा घेण्यात आला होता. या भिंतींवर पत्रके लावून शहर विद्रुपीकरण केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

NewsToday24x7

Next Post

कर्नाटकामुळे लोकशाही मजबूत...!

Thu May 18 , 2023
काळाचा तडाखा अजब असतो. अतिरेक, आमच्या सरकारला कोण अडवणार? असा राजकीय अहंकार जेव्हा असतो, या सर्वांची उत्तरं काळ देत असतो. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही मानली गेली. त्यामुळे असे अहंकारी पराभूत झाले. आता पंतप्रधान मोदी-शहा यांना त्यांच्या पक्षाचा पराभव पाहण्याची वेळ आली आहे आणि हे अपरिहार्य होते. या देशात तुम्ही घटना उध्वस्त करू पहाल आणि हुकूमशाहीच्या जोरावर हवा तो धिंगाणा […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com