कन्हान :- अंतर्गत २ कि. मी. अंतरावरील फिर्यादीचे राहते घरी खदान नं. ०६ पाणी टाकी जवळ कन्हान येथे दिनांक ०२/१०/२०२३ चे १४.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- संगीता सुशील केवट (निषाद) वय २४ वर्ष रा. आमली कोर (राजापुर सिम्बा डेरा) तह तेंदवारी जिल्हा बांदा उत्तर प्रदेश ह. मु. खदान नं. ०६ पाणी टाकी जवळ कन्हान व आरोपी नामे आकाश राजभर, वय २० वर्ष, रा. खदान नं. ०६ कन्हान ता. पारशिवनी हे एकाच मोहोल्ल्यात राहत असून फिर्यादीचे राहते घरी आरोपी याने अनाधिकृत प्रवेश करून काही वेळा पुर्वी झालेल्या झगड्याच्या कारणावरून त्याच्या जवळील धारदार चाकुने फिर्यादीचा भाऊ सुनिल चुन्नुलाल केवट, वय १९ वर्ष याच्या छातीवर वार केला व त्याला उपचार करण्याकरिता कामठी येथील सरकारी दवाखाण्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून सांगीतले की त्याचा मृत्यु झाला आहे..
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपीविरुध्द कलम ३०२, ४५२ भादवि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते पो. स्टे, कन्हान हे करीत आहे..