नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत छोटा ताजबाग, भोसलेवाडा परिसर, राजे रघुजी नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नरेन्द्र रामदास तितरमारे, वय ५२ वर्षे, यांनी त्यांची होंडा पेंशन एक्स प्रो मोटरसायकल क. एम.एच. ४९ एम ०२३५ किंमती एकुण २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत छोटा ताजबाग मेनगेट समोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी पथकचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून, सापळा रचुन आरोपी नामे पिंटू उर्फ रोहीत मुरलीधर लांजेवार, वय ३९ वर्षे, रा. प्लॉट नं. १०, विडीपेठ, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हयातील वाहन चोरीची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील बोरी केलेले वाहने एकुण किंमती २५,०००/- रू चे जप्त करण्यात आलेले आहे. आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी सक्करदरा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शखाली, गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली.