लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपले गाडीवर महीलांना बसवुन त्यांचे अंगावरील सोने हिसकावून घेणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

नागपूर :- फिर्यादी नामे पुष्पा पांडुरंग चौधरी, वय ६५ वर्ष, रा. मोहखेडी ता. मौदा जि. नागपूर ही मुलीचे गावी उमरेडला जाण्याकरीता मौदा बसस्टॉप येथे वाट पाहत उभी असताना अनोळखी मोसास्वार आरोपी हा तेथे येवुन मी मांढळ येथील असुन उमरेडकडे जात आहे. तुम्हाला मोसाने उमरेडला सोडतो. फिर्यादीला मोसावर बसवून जात असता सोनपुरी गावाजवळ तिला फोन आल्याने आरोपीने मोसा थांबवुन तिला तुमचे मानेवर अळी असल्याचे सांगुन तिचे गळयातील सोन्याचे मनी व मंगळसुत्र असा मुद्देमाल हिसकावुन पळून गेल्याचे फिर्यादीचे तोंडी रीपोर्ट वरून पोस्टे कुही येथे अप क्र. ४०८/२०२४ कलम ३०४(२) भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना व आरोपीचा शोध करीत असता गोपनीय बातमीदारा कडून माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा मौदा बस स्टॉपजवळ चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्याकरीता येत आहे. अशा खबरेवरून पथकाने सापळा रचुन आरोपी नामे नितेश उर्फ लोकेश सुरेश देशमुख वय 30 वर्ष रा. सिषर्षोली पोस्ट मोरगाव ता मौदा यास मो.सा क्र. MH-40 CS-5288 सह ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता गुन्हयाची कबुली दिली. आरोपीकडुन १) सोन्याचे लॉकेट मनी १०.४७० मि.ग्रॅ. किंमती ७०,०००/-रु. २) मनी व डोरले ३. ७८० मि.ग्रॅ. किंमती २५०००/-रू. ३) होंडा शाईन मोसा क्र. MH-40 CS-5288 किंमती ७०,०००/- रू. असा एकूण १,६५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कुही यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बडूलाल पांडे, स.पोउपनी विनोद काळे, पोहवा अरविंद भगत, मयूर डेकले, प्रमोद भोयर, पोना संजय बरोडिया, पोशी राकेश तालेवर, चापोशी आशुतोष लांजेवार चापोशी सुमीत बांगडे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बुडणाऱ्या मुलीला तत्परतेने वाचवून दिले जीवदान

Fri Aug 16 , 2024
– अंबाझरी पोलीस ठाणे, नागपूर शहर नागपूर :- पोलिस ठाणे अंबाझरी येथील फुटाळा तलाव येथे आज दिनांक 16/08/2024 रोजी दुपारी 13.15 वाजताचे सुमारास मुलगी नावे गायत्री सुभाष सुपटकर वय 18 वर्ष राहणार न्यू नरसाळा ,कृष्णनगरी च्या बाजूला, नागपूर ही राहते घरी वाद झाल्यामुळे रागाचे भरात येऊन फुटाळा तलाव येथे उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असता पेट्रोलिंग वरील बीट मार्शल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com