नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार है पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून त्यांनी जिल्हा रूग्णालय मानकापूर समोरील रोडवर हिरो होन्डा गाडी क. एम. एच ३२ यू ९६७४ वरील संशयीत ईसम यास थांबवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव मयुर गजानन नाकाडे वय २३ वर्ष रा. कारला चौक, वर्धा असे सांगीतले. त्यास वाहना बाबत चौकशी केली असता, त्याने सुरवातीला उड़वा-उडविये उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन विचारपूस केली असता त्याने नमुद वाहन पोलीस ठाणे वर्धा शहर येथील पोस्ट ऑफीस समोरून चोरी केल्याचे सांगीतले. आरोपीचे आरोपीने ताब्यातुन नमुद मोटरसायकल किंमती अंदाजे ५०,०००/- ची जप्त करण्यात आली आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई करीता वर्धा शहर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, राहुल शिरे व त्यांचे पथकाने केली.