नागपुर :- पोलीस ठाणे पाचपावली हटीत मोहम्मद रफी चौक, जयस्वाल रेस्टॉरन्टचे समोर, गोविंद रोड लाईन ट्रान्सपोर्ट ऑफीसचे बाजुला फिर्यादी प्रितमसिंग जोगींदरसिंग सैनी यांनी वय ४९ वर्ग रा. कडबी चौक, नागपूर यांनी त्यांचे ट्रकचे जुने ययर एकुण १२ नग किंमती अंदाजे ६०,०००/- रू. चे ठेवले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयाचे तपासात पाचपावली पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी आरोपी नामे शहवाज शेख उर्फ भांजा वल्द अयुब शेख वय २८ वर्ष रा. कामगार नगर, गौसीया मस्जिद जवळ, कपिलनगर, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन ८ नग टायर किंमती अंदाजे ४०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर, महक स्वामी, पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), सहा. पोलीस आयुक्त श्वेता खाडे (लकडगंज विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, बपोनि. बाबुराव राऊत, पोनि गुन्हे हरीष काळसेकर, पोहवा. पवन भटकर, राजेश कोकाटे, पोअं. शंकर आगडे, ओमप्रकाश बुरडे, शाहनवाज मिर्जा, मनोज चौधरी व मपोअं. प्रिती यांनी केली.