कोदामेंढी :- येथील बैंक ऑफ़ इंडिया शखेतून शेतीकामासाठी दरवर्षी कर्ज घेऊन त्याची नियमितपने परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यानसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जामुक्ति योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यानसाठी 50000(पन्नास हजार) रुपये प्रोत्साहन लाभ योजना आर्थिक वर्ष 2022-23 मधे सुरु केली.1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष 2023-24 सुरु झाल्यानंतरही 20 टक्के नियमित कर्ज भरणारे शेतकरी वंचित असल्याची माहिती बैंक ऑफ़ इंडिया चे क़ृषि अधिकारी चंदन थोटे. कोदामेंढी येथे राहणारे व जवळच सावंगी गावात शेती असणारे या योजने अंतर्गत यादित नाव असणारे लाभार्थी मदन चैनु साहू यांनी तीन महिन्यापूर्वी बँकेत तेथील बैंक प्रतिनिधि व कंत्राटी कर्मचारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, त्यांनी त्यांचे आधारकार्ड सत्यप्रत थोटे यांना दिले.एक महिन्यापूर्वी खात्यात रक्कम जमा न झाल्याने, आधार प्रमाणिकरण पत्र आनण्याचे थोटे यांनी सांगितले. आधार प्रमाणिकरण पत्र दिल्यानंतरही पुन्हा रक्कम जमा न झाल्याने, पंधरादिवसापूर्वी, तीसऱ्याँदा त्यांचे मोठे सुपुत्र पत्रकार किशोर साहू यांना सोबत बँकेत घेऊन गेले असता, थोटे यांच्याशी विचारपूस केली असता, थोटे यांनी सांगितले कि, तुमचेच नव्हे तर आणखी 70 ते 80 शेतकऱ्याँचे प्रोत्साहन लाभ अजूनही काही तांत्रिक अडचनिमुळे जमा झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या बँकेतील एकूण किती पात्र शेतकऱ्यानपैकी किती शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा झाल्याचे विचारले असता, जवळपास 310 ते 320 शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा झाल्याचे थोटे यांनी सांगितले.यावरुन 20 टक्के नियमित कर्ज भरणारे शेतकरी अजूनही प्रोत्साहन लाभापासून वंचित असून, सहकार विभागातील संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी वंचित शेतकऱ्याँचे अनुदान जमा करावे, अशी मागणी मदन साहू यांचेसह वंचित शेतकऱ्यान्नी केली आहे.
20 टक्के नियमित कर्ज भरणारे शेतकरी प्रोत्साहन लाभापासून वंचित
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com