स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई
नागपुर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतील दहेगाव रंगारी येथे दिनांक 14/09/2022 चे 10.00 वा. ते 11.00 वा. दरम्यान एमच-34/एबी-3590 क्रमांकाचा ट्रकचा चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात चालक आरोपी क्र. 1) ट्रक चालक नामे- विग्नेश उर्फे गणपत निलकठंराव कावळे, वय 22 वर्ष, रा. वार्ड नं 4 कालीमंदीर जवळ वलनी, 2) ट्रक मालक विनायक बोडे रा.दहेगाव रंगारी, 3) चॉंद अंसारी रा.वलनी, 4) पिवळया रंगाची जे सी बी ऑपरेटर रा.वलनी यांनी संगनमत करून त्यांच्या ताब्यातील वाहनात विनापरवाना अवैधरित्या 4 ब्रास रेती किं. 12,000/- रू. ची भरून वाहतुक करतांना मिळुन आले. वाहनासह एकुण 15,12,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी सरतर्फे सपोनि अनिल राउत स्थानिक गुन्हे शाखा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीविरुध्द कलम 379, 109 भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला सुचनापत्रावर रिहा करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि मिश्रा हे करीत आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक अनिल राउत, पोलीस हवालदार नाना राऊत, राजू रेवतकर, पोलीस नाईक विरेन्द्र नरड, प्रणय बनाफर, आशिष मुंगल, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल यांचे पथकाने केली.