नागपूर :-फिर्यादी संकेत बाबुराव गावंडे वय ३१ वर्ष रा. शिव ईलाईट बनविण्याचे ठेकेदार असुन त्यांचे तिरूपती डेव्हलपर्स कंपनीचे पोलीस ठाणे शंकरपूर, वर्धा रोड, नागपूर हे रोड हिंगणा हद्दीत गवसी मानापूर, येथे रोड बनविण्याचे काम सुरू असुन त्या ठिकाणी रोड बांधकामा करीता लागणारे लोखंडी चैनल ठेवलेले होते. दिनांक २७. ०७.२०२४ चे १९.३० वा. ते दि. २८.०७.२०२४ ये ०७.०० वा. चे दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने बांधकाम साईटवरून ७४ नग लोखंडी चैनल किंमती १,११,०००/- रू. चोरून नेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात हिंगणा पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी क. १) दिपचंद्र रामस्वरूप कुशवाह वय २५ वर्षे, रा. ग्राम पूनाहूर, ता. अर्तरा, जि. बांदा, उत्तर प्रदेश, ह.मु कुशवाह यांचे परी किरायाने, बालाजी नगर, कळमणा, नागपूर २) कमल रामदेव कुशवाह वय २७ वर्ष रा. ग्राम मरौली, ता. बबेरू, जि. बांदा, उत्तर प्रदेश ह.मु. शाहु यांने घरी किरायाने, कळमणा, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपींनी नमुद चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन ७४ नग लोखंडी चैनल व गुन्हयात वापरलेली महेन्द्र बोलेरो पिकअप गाडी असा एकुण किंमती अंदाजे ६,११,०००/- रू या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (परि. क. १), मा. सहा. पोलीस आयुक्त (एम.आय.डी.सी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. विनोद गोडबोले, सपोनि. पांडुरंग जाधव, पोहवा. नागेश्वर दासरवार, गोविंद अडेकर, पोअं. अनिल झाडे व संजीव तायडे यांनी केली.