वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, ०६ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ८७, भाऊसाहेब सुर्वे नगर, प्रतापनगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी अजय माणिकराव वायगावकर वय ६० वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल क. एम. एच ३१ वि.व्ही ३७९५ किंमती १०,०००/- रू ची, घरा समोर लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे वाहन चोरून नेले, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्यां.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात प्रतापनगर पोलीसांना पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून आरोपी क. १) आदित्य राजेन्द्र राहंडाले वय २१ वर्ष रा. जयवंत नगर, हनुमान मंदीर जवळ, सोनेगाव, नागपूर २) करण विनोद बुलकुंडे वय १९ वर्ष रा. फुलमत्ती ले-आउट, अजनी, नागपूर ३) कुणाल देवेन्द्र शर्मा वय १९ वर्ष रा. ओमकार नगर, अजनी, नागपूर ४) सुजल राकेश ढाले वय १९ वर्ष रा. पंच्याशी प्लॉट, रमानगर, अजनी, नागपूर विचारपूस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली, त्यांना अधिक सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतुन १ वाहन चोरी व १ घरफोडीचा गुन्हा, पोलीस ठाणे अजनी हद्दीत २ घरफोडीचे गुन्हे, पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत १ परफोडीचा गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपींकडुन एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणुन आरोपी कडुन दोन मोटरसायकल, सोन्या-चांदीचे दागिने, टि.व्ही, लॅपटॉप असा एकुण ३,७०,८००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि. क. १), सहा. पोलीस आयुक्त (सोनेगाव विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. महेश सागडे, सपोनि अमोल तांबे, पोउपनि, संतोष राठोड, पोहवा, दिनेश भोगे, एकनाथ पाटील, निलेश तरायकर, पोअं, अंकुश कनोजिया, ऍलेक्सझेंडर डिकुज, आनंद कवालीया, गजानन जहीरराव, अतुल राठोड यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महसूल पंधरावडा निमित्त ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालयासाठी’ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरसावले हात

Mon Aug 5 , 2024
▪जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी घेतला सहभाग नागपूर :- राज्यात दि. 1 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या महसूल पंधरवाडा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छता उपक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com