संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22 :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा -सोनेगाव मार्गावर विना रॉयल्टी अवैधरित्या ट्रॅक्टर क्र एम एच 40 बो जी 1639 ने वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकटर वर महसुल पथकाने धाड घालण्याची यशस्वी कामगिरी सकाळी साडे सात दरम्यान केली असून या धाडीतून 1 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कार्यवाही नायब तहसीलदार आर उके, मंडळ अधिकारी संजय कांबळे, मस्के तसेच तलाठी वावरे यांनी मोलाची भूमिका साकारली.