नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ से अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेले खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत साई मंदीर चौक, नागपूर येथे सापळा रचुन ग्रे रंगाची टाटा पंच गाड़ी क. एम.एच. ३२ ए.एस ९९८५ ला थांबवुन चालक व त्याचे बाजुला बसलेला यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) अमर अशोकराव सुनके वय ३३ वर्ष रा. शास्त्री वार्ड, काली सडक, हरा दगार्ह जवळ, हिंगणघाट, जि. वर्धा २) राकेश शंकरसिंह नंदल तय २५ वर्ष रा. खंडोबा वार्ड, लोटन चौक, हिंगणघाट, जि. वर्धा असे सांगीतले. पंचासमक्ष त्यांचे गाडीचे डिक्कीची पाहणी केली असता त्यामध्ये ओ.सी. ब्ल्यु विदेशी दारूचा एक बॉक्स ज्यात १८० एम.एल च्या एकुण ४८ बॉटल असलेला तसेच रॉयल स्टॅग व्हीस्कीचे ५ वॉक्स ज्यात प्रति बाक्स १८० एम.एलच्या एकुण ४८ चॉटल असा मुद्देमाल मिळुन आला, आरोपींना अधिक विचारपूस केली असता त्यांनी ते दोघे अविनाथ नवरखेडे रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा यांचे कडे १० हजार रूपये महिन्याने काम करीत असुन त्यांनीच त्यांचे वरील बाहन देवुन ओका बार अॅण्ड रेस्टॉरन्ट, कामठी रोड, जरीपटका, नागपूर येथुन नमुद मुद्देमाल आणण्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन विदेशी दारूने एकुण ०६ बॉक्स व वाहन असा एकूण ६,५३,२८०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरील दोन्ही आरोपी तसेच पाहिजे आरोपी अविनाथ नवरखेडे व ओका बार अॅण्ड रेस्टॉरेन्ट चा मालक यांचे विरूध्द पोलीस ठाणे जरीपटका येथे कलम ६५(अ) म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता जरीपटका पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकंद ठाकरे, पोउपनि, नवनाथ देवकाते, सफौ. ईश्वर खोरडे, पोहवा, मुकेश राऊत, अमोल जासूद, अनुप तायवाडे, विनोद गायकवाड, नापोअं. संतोष चौधरी यांनी केली.