घरफोडी व वाहन चोरी करणारे आरोपी जेरबंद, पाच गुन्हे उघडकीस, एकुण ५,६५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त.

नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली प्लॉट नं. ८६०, बुद्धनगर, चंद्रमनी बुद्ध विहार जवळ लांजेवार चे घरी किरायाने राहणारे फिर्यादी सुनिल भिमराव ताकसादे वय ५० वर्ष पो.ठाणे पाचपावली, नागपुर हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे खिडकीचे दार उघडून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व लॅपटॉप, एल.सी.डी. तसेच रोख १,००,०००/- रु. असा एकुण २,८०,०००/- रू चा मुद्देमाल चोरी करून घेवुन गेल्याने अज्ञात चोरटया विरुध्द फिर्यादीच्या रिपोर्ट वरून गुन्हा कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ भादंवी, अन्वये गुन्हा दाखल होता.

पाचपावली पोलीसांना गुन्हयाच्या तपासात आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांकडून माहीती मिळाली कि सदर गुन्हयातील आरोपी १) अमर उर्फ प्रिन्स विनोद डोंगरे वय १९ वर्ष रा. प्लाट नं. ७१ आंबेडकर कॉलनी एन. आय. टी गार्डन जवळ, बन्सोड यांचे घरी किरायाने पो. ठाणे जरीपटका, २) रुद्रेश उर्फ रूद्र युवराज साखरे वय १५ वर्षे रा. गल्ली नं. ११, नमो बौद्ध विहार जवळ, इंदोरा पो. ठाणे जरीपटका, नागपूर व दोन विधिसंघर्षग्रस्त बालक हे चोरी केल्यानंतर मुंबई तसेच नाशिक येथून फिरून नागपूर येथे परत आले आहे. आरोपींनी नागपूर येथे महागडे मोबाईल व कपडे खरेदी केले असुन शरीरावर महागडे टॅटयू काढले आहे व ते पैश्याची उधळपट्टी करत आहे. अशा प्राप्त माहितीवरून आरोपीना सापळा रचुन ताब्यात घेतले आरोपींना गुन्हयाचे संदर्भात विचारपूस केली असता आरोपांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच विधिसंघर्षग्रस्त बालक यांना त्यांचे पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

गुन्हयातील अटक आरोपी यांना तपासादरम्यान अधिक विचारपूस केली असता १) आरोपीनी व विधीसंघर्षग्रस्त बालकांनी मिळून ३ ते ४ महीन्या अगोदर बाया. एन.एम.सी. च्या शाळेतुन एक एलसीडी टि.व्ही. चोरी केल्याचे सांगितले. पो. ठाणे पाचपावली येथील कलम ४५४.४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला. २) आरोपींनी व विधीसंघर्षग्रस्त बालकांनी दि. ०१.०६.२०२३ रोजी पंचशिल नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती असलेल्या जवळ एका घराचे कुलूप तोडुन मंगळसूत्र आणि कानातले दागीने चोरी केल्याचे सांगितले वरून पो. ठाणे पाचपावली कलम ४५४,४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला. ३) आरोपींनी रामटेक ता नागपूर ग्रामीण येथून एक ब्लॅक व पिवळे पट्टे रंगाची होन्डा एस. पी. १२५ इम जिया क्रमांक एम.एच-४० सी.जी. ८४०६ कि.अ. ५०,०००/- ४) एक स्प्लेंडर लस गाडी ज्यावर नंबर नसलेली काळया रंगाची किं.अ. ५०,०००/- रू चोरी केल्याचे सांगितले. पो.ठाणे रामटेक येथील कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले.

पाचपावली पोलीसांनी पो ठाणे येथील घरफोडीचे व रामटेक, नागपूर ग्रामिण येथील वाहन चोरीचे २ गुन्हे असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले. आरोपीचे ताब्यातून एकुण ५,६५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरील कामगिरी गोरख भामरें, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ३, नागपूर व सचिन चोरबीले सहा. पोलीस आयुक्त, लक्कडगंज विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि, वैभव जाधव, पो. नि. (गुन्हे) महेन्द्र अंभोरे, पोउपनि जितेन्द्र भार्गव, पोहवा, ज्ञानेश्वर भोगे, पौना इमरान शेख, रोमेश सेनेवार, गाण यादव,संतोष शेन्द्रे, राहुल चिकटे, महेन्द्र सेलोकर, नितीन लोखंडे, दिपक, मपोअ अश्विनी यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ANNUAL TRAINING CAMP OF NO 2 (MAH) AIR SQN NCC

Mon Jun 19 , 2023
Nagpur :- The annual training camp for NCC cadets of No 2 (Mah) Air Squadron NCC, Nagpur is being conducted at Saoner from 12 June to 21 June 2023. More than 350 cadets from 9 schools and various colleges from Nagpur are undergoing training in the camp. The annual training camp is conducted with the objective of imparting centralized training to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com