कळमेश्वर :- गुन्हे रजि.नं ८७९/२०२४ कलम ३०४ (२), ३(५) भा.न्या.स. गुन्हयाचा समांतर तपास करण्याचावत पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, यांनी आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार केले व गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. सदर गुन्हयाचा समांतर तपासामध्ये फिर्यादी व साथीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीच शोध घेणे सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की गुन्हातील आरोपी हे कपिल नगर भागातील आहेत माहितीवरून शोध घेत असता आरोपी १) निलेश उर्फ अभी राजू कडवे वय २७ वर्षे, रा. समता नगर, नागपूर हा संशयितरित्या मिळून आल्याने त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार आरोपी व २) उस्मान अकबर खान २० वर्ष रा. कपिल नगर नागपूर याचे सह मिळुन गुन्हा केल्याचे व गुन्ह्यातील हिसकावलेले सोन्याचे मंगळसूत्र आरोपी क्रमांक एकचा साथीदार ३) पाहिजे आरोपी फैजान अन्सारी रा. टिमकी, मोमीनपुरा नागपूर यास विकले बाबत माहिती उघड केल्याने व गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा होंडा मोटरसायकल त्याचे ओळखीचे इसमास विकल्याचे माहितीवरून आरोपी क्रं. २ जवळून १. चाळीस हजार रुपये नगदी २. एक विवो मोवाईल १०,०००/रू ३. एक होंडा डर मॉपेड कि. १००,००० तसेच ४. साक्षीदार याचे जवळ असलेली गुण्यात वापरलेली एक्टिवा होंडा मोपेड कि. १००,०००रू असा एकूण २५००००रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीत ०२ इसमांना गुन्ह्याचे पुढील तपासात पो.स्टे. कळमेश्वर येथे मुद्देमालासह हस्तातरित करण्यात आलेले आहे.
सदरची कार्यवाही ही हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स.पो.नी. किशोर शेरकी, स.पो.ती.मनोज गदादे, स.पो.नी. जीवन राजगुरू, स.पो.नी. आशिष ठाकूर, स.पो.नी. सागर गोमासे, पो. उप. नि. बत्तुलाल पांडे, पो. हवा. संजय बांते, पो.हवा. इक्बाल शेख, पो.हवा. प्रमोद भोयर, मपोहवा नीतू रामटेके, पो. ना. संजय वरोदीया, पो.ना.सतीश राठोड, सायबर सेल, बा.पो.हवा. राहुल पाटील, चापो. हवा. आशुतोष लांजेवार, पोलीस नायक सुमित व इतर स्टाफ यांनी पार पाडली.