जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना १२ तासाचे आत अटक

कामठी :-पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत जेपी नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी चंदन पन्नादास डोंगरे वय ३० वर्ष हे त्याचे दुचाकी वाहनाने कामा निमीत्त बाहेर गेले असता पाऊस आल्याने त्याचे खिश्यातील मोबाईल व नगदी ४,०००/- रू हे पाऊसाने ओले झाल्याने ते ड्रॅगन पॅलेस पोलीस चौकी जवळ, आपली गाडी थांबवुन गाडीने डिस्कीत ठेवत असतांगा दोन अज्ञात चोरट्‌यानी अॅक्टीव्हा गाडीवर येवुन फिर्यादी जवळील मोबाईल व नगदी ४,०००/- रू जबरीने हिसकावून पळुन गेले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दि. ११.०४.२०२४ रोजी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे नविन कामठी येथे सफौ पिल्ले यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३९२ भा.द.वि. कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्वरीत दखल घेवुन तांत्रीक तपास करून तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळलेल्या माहिती वरून आरोपी क. १) बादल राजपाल मेश्राम वय २५ वर्ष रा. देवनगर, कॉलोनी, कामठी, नागपूर २) आस्तीक उर्फ मोन्टू दिलीप सोमकुवर वय २१ वर्ष रा. कुंभारे कॉलोनी, कामठी, नागपूर यांना ताब्यात घेवुन आरोपीचे ताब्यातुन फिर्यादीचा मोबाईल, नगदी २,५००/- रू व गुन्हयात वापरलेले अॅक्टोव्हा गाडी क. एम.एच ४० पी.एफ ५४५७ जप्त करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांतीक अपघात करणारा आरोपी ताब्यात

Fri Apr 12 , 2024
नागपूर :- दिनांक ११.०४.२०२४ चे १८.३० वा. चे सुमारास, फिर्यादीचा परिचीत रोशन बन्सोड वय ४२ वर्ष रा. सुर्या रोड लाईन्स, वार्ड नं. १. सुराबर्डी, वाडी, नागपूर हा पोलीस ठाणे वाडी ह‌द्दीतुन, अमरावती रोड वरील सारंग बार वडधामना रोडवरून रोड क्रॉस करीत असतांना शिवशाही बस क. एम. एच ०६ वी डब्लू ०१४० चे चालक नामे विजय अशोकराव निखाडे, वय ४३ वर्षे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com