नागपूर :- पो.स्टे. कुही फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. कुही येथे अप क्र. ५२/१९ कलम ३७६ (३), ३७६ (२) (जे) भादवि सहकलम ३, ४ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्हयात यातील फिर्यादी व आरोपी नामे- रामदास मारोती ठाकरे, वय ५९ वर्ष रा. डोंगरगाव हे एकाच गावात राहत असून फिर्यादीची अल्पवयीन पिडीत मुलगी ही गावातील नहरावरून कपडे धुवन घरी परत येत असताना आरोपीने फिर्यादीच्या पिडीत मुलीला एकटी पाहुन तिचा हात पकडुन शेतातील झुडुपात ओढत नेले व पिडीतेशी आरोपीने जवरी संभोग केला व जिवाने मारण्याची धमकी दिली.
सदर प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले, आज दिनांक २०/०७/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश एक्स्ट्रा. डी. जे त्रिवेदी, न्यायाधिश नागपूर यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३७६ (३) मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व १०,०००/रु दंड दंड न भरल्यास ०२ महिने सश्रम कारावास तसेच कलम ५०६ (२) भादवि मध्ये ५ वर्ष सश्रम कारावास व २०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी राउत यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी कर्मचारी म्हणून पोलीस हवालदार दिलीप लांजेवार पो.स्टे. कुही यांनी मदत केली आहे.