नागपूर :- दिनांक २६.०५.२०२३ चे २२.०० वा. ते दिनांक २८.०५.२०२३ चे ०४.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत राहणारी २४ वर्षीय फिर्यादी यांचा परिचीत आरोपी नामे संजय रामचंद्र डोंगरे वय ३५ वर्ष रा. भिवसनखोरी, गिट्टीखदान याने फिर्यादी ही घरी हजर असतांना आरोपी हा दारू पिऊन फिर्यादीचे घरी आला फिर्यादीस “तु मला खुप आवडते असे बोलून फिर्यादी सोबत तिचे ईच्छेविरुध्द जबरदस्ताने शारिरीक संबंध प्रस्थापीत केले, तसेच आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून याबाबत कोणाला काहिही सांगीतल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे सपोनि कंकाळ यांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (एन), ४५२, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com