घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- जुनी कामठी पोलीसांचे तपास पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, हरीदास नगर, बुध्द विहार जवळ, कामठी, नागपुर येथे एक संशयीत ईसम दिसल्याने तो पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना, त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे खिशात एक स्टील चा मोठा चाकु मिळुन आल्याने ताब्यात घेतला. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव क्षितीज आतीश राहटे, वय २० वर्षे, रा. हरीदास नगर, कामठी, नागपूर असे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन एक स्टील बा मोठा चाकु किंमती ३५०/-रू. चा जप्त करण्यात आला. आरोपी हा घातक शस्त्र बाळगतांना समक्ष मिळुन आल्याने व त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे जुनी कामठी येथे सपोनि. हिवरकर यांनी आरोपीविरूध्द कलम ४, २५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने राज्याला दिलेले धान्य वितरणाचे लक्ष्य ७ कोटिंवरून वाढवून 8 कोटी 20 लाख इतके करावे : धनंजय मुंडे यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना विनंती

Thu Jan 30 , 2025
नवी दिल्ली :- महाराष्ट्र राज्याला लाभार्थ्यांचे सुधारित वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अधिनियम २०१३ अंतर्गत तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर ७ कोटी १६ हजार इतके लक्ष्य दिलेले होते. मात्र मागील दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून ८ कोटी, २० लाख, ६१ हजार इतके करण्यात यावे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला २०२१ साली प्रस्ताव दिलेला आहे, त्यास मान्यता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!