नागपूर :- दिनांक ०५.०५.२०२३ चे १३:३० वा. ते दि.०६.०५.२.२३ चे ०७.०० वा. चे दरम्यान पो. ठाणे वाठोडा हद्दीत, प्लॉट नं. ५७, शंकर नगर, पावर हाउस जवळ, खरबी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी दिपक जगनराव इंगोले वय ५३ वर्ष, हे आपले घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घराचे आलमारीमधुन सोन्याचे दागीने एकुण किमती १६,००० /- रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे. वाठोडा येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४. ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद होता.
गुन्हेशाखा, युनिट ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयाचे समांतर तपासात गुप्तबातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आज दिनांक २१.०५.२०२३ चे सकाळी ०८.०० वा. चे सुमारास जुनी कामठी नाका येथे सापळा रचुन आरोपी संदीप खेमचंद ठेबरे वय २३ वर्ष रा. शिवनी, मध्यप्रदेश ह.म. अब्बूमया नगर भांडेवाडी, नागपूर यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारले असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. अधीक सखोल विचारपुस केली असता आरोपीने पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत तिन घरफोडीचे गुन्हे व पोलीस ठाणे सक्करदरा येथे एक घरफोडीचा गुन्हा व एक वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने पोलीस ठाणे तुमसर, जि. भंडारा येथे दोन वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुर दुचाकी वाहन २) एम.एच. ३६ एस ८८२९ किमती ३०,०००/- रू २) एम.एच. ३६ एस ९५६७ किमती ३०,०००/- रू ३) एम.एच ४९. ए. एफ. ९२१४ किमती ३०,०००/- रू तसेच सोन्या-चांदीचे दागिने व लॅपटॉप व रोख २८,०००/- रू असा एकुण ४६०,४००/- या मुद्देमाल जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणलेले आहे. आरोपिस मुद्देमालासह पुढील योग्य कारवाईस्तव वाठोडा पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज सिडाम, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि महेश सागडे, सपोनी, पवन मोरे, पोउपनि मधुकर कोठाके, बलराम झाडकर, सफी. सतिश पांडे, दशरथ मिश्रा, श्याम अंगथुलेवार, विजय श्रीवास, आनंद काळे, मिलींद चौधरी, अनिल बोटरे, पोअ विशाल रोकडे, जितेश रेड्डी, दिपक दासरवार, दिपक लाकडे यांनी केली.